बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज तळोजा येथे पहिला “नॅशनल मुट कोर्ट कॉम्पिटिशन” संपन्न
सिटी बेल | उरण | सुभाष कडू |
बाळासाहेब ठाकरे यांच्या 96व्या जयंती निमित्त,कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज तळोजा पनवेल येथे”नॅशनल मुट कोर्ट कॉम्पिटिशन” संपन्न झाली.या स्पर्धेत देशभरातील विवीध विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी वकीलीचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे वकिलीतील कसब बघुन सर्व मान्यवर भारावून गेले होते.या स्पर्धेसाठी मुख्य अतिथी हे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश माननीय प्रमोद दत्ताराम कोदे हे उपस्थीत होते.
मुट कोर्ट स्पर्धा ही वकिलीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कोर्टाचे कामकाज कसे चालते याचे प्रात्याक्षीक आसते.या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले वकीलीतील सुप्त गुण पुढे आणण्यासाठी एक व्यासपिठ निर्माण होत आसतं.म्हणून बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजा पनवेल मध्ये प्राचिर्य डाॅ.राजेश साखरे यांनी विद्यालयातील आपल्या सहकार्यांच्या मदतीनं आणी संस्थापक बबन दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रिय मुट कोर्टचं आयोजन केलं होतं.
स्थानिक विद्यार्थ्यांना विधी शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना
कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजा पनवेल हे सन 2016 ला शिवसेना नेते बबनदादा पाटील यांनी सुरू केले आहे.स्थानिक विद्यार्थ्यांना विधी शिक्षण घेण्यासाठी या कॉलेजमध्ये बारावीनंतर (बी एल एस एल एल बी) पाच वर्षाचा ,त्याच प्रमाणे पदवीनंतर तीन वर्षाचा (एलएलबी ) व एल एल बी नंतर ( एल एल एम ) हे कोर्सेस चालू केले आहेत. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बबन दादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज मध्ये लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जेल प्रशासन तसेच न्यायालय व पोलीस स्टेशन कश्या प्रकारे कार्य करतात ते शिकण्यासाठी भेटी आयोजित केल्या जातात. वक्तृत्व स्पर्धा आणि वकीलीतील कसब विद्यार्थ्यांना मिळावेत म्हणून “मुट कोर्ट स्पर्धा” ही सुद्धा आयोजित केल्या जातात.
राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट स्पर्धेसाठी, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई,रायगड जिल्हा मुख्य सरकारी वकील भूषण साळवी, मुंबई विद्यापीठ विधी विभागप्रमुख डॉ. स्वाती रौतेला यांनी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर पनवेल न्यायालयातील मुख्य न्यायाधीश राव साहेब व नांदेड चे अतिरिक्त सेशन न्यायाधीश दुर्गप्रसाद देशपांडे यांनी सुद्धा ऑनलाईन गूगल मीट वरती मार्गदर्शन केल. तर काॅलेजचे प्राचार्य नाईक सर,मा.न्या.जितेंद्र घाडी,अॅड. राजशेखर मालुष्टे, अॅड. प्रमोद प्रार्थने यांचे सहकार्य लाभले.तर स्वयंसेवक म्हणून महेश कोनवलकर, रश्मी शिंदे, वशिम शेख, अनिल थोरात, गौरव सक्सेना, शैलेश गोळे,विकेश पवार, प्रमोद खिल्लारी, सागर कांबळे, शुभम तिवारी, किरण पाटील, नम्रता आदी विद्यार्थ्यांनी काम पाहीले.








Be First to Comment