Press "Enter" to skip to content

पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ संपन्न

सिटी बेल | नंदुरबार |

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.