Press "Enter" to skip to content

भव्य दाखले शिबीर संपन्न

इंडियन्स सोशल मुव्हमेंट संघटनेच्या वतीने आदिवासी वंचित शोषित घटकांसाठी शिबीर

सिटी बेल | पनवेल |

पनवेल मध्ये इंडियन्स सोशल मुव्हमेंट या सामाजिक संघटनेच्या वतीने आदिवासी वंचित शोषित घटकांसाठी भव्य नागरिक शिबीर राबविण्यात आले. या भव्य नागरिक शिबीरामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आनंदा होवाळ, राष्ट्रीय अध्यक्ष सविता ताई सोनावणे कदम या शिबिराचे आयोजन प्रामुख्याने आयु प्रकाश कदम प्रवक्ता एवं मीडिया प्रमुख, आयु नरेश परदेशी पनवेल शहर अध्यक्ष, आयु. दिलीप नाईक उपाध्यक्ष, आयु, अजय पाटील पनवेल सचिव, आयु. मयूर परदेशी वडघर अध्यक्ष, विकास केणी, संदीप पाटील, संकेत चंदणे, अरुण केणी, रवी परदेशी आणि इतर सदस्यांनी मेहेनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

सरकारच्या अनेक योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना कागदपत्र नसल्यामुळे घेता येत नाही. म्हणूनच आदिवासी तसेच इतर नागरिकांच्या – सेवेसाठी इंडियन्स सोशल मूव्हमेंट संघटनेच्या वतीने पनवेल तालुक्यामध्ये भव्य नागरिक शिबीर वेळ सकाळी 10 पासून 5 वाजेपर्यंत आयोजित केले होते. यामध्ये प्रामुख्याने जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, जेष्ठ नागरिक दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांची नोंद करण्यात आली. इंडियन्स सोशल मूव्हमेंट ही तळागाळातील सर्व व्यक्तींच्या न्यायासाठी लढायला सज्ज आहे. आदिवासी दुर्गम भागातील विभाग जो वर्षोवर्षं अंधकारमय जीवन जगत आहे, शिक्षण नसल्याने अडाणीपणा, गरीबी अज्ञान या गोष्टींना सामोरे जावे लागते. घराच्या अवतीभोवती असलेलं घाणीचं साम्राज्य,अशिक्षित असल्यामुळे कुंठित असलेला बुद्धीचा विकास अश्या अनेक संकटांना तोंड देत ते आपलं आयुष्य जगत आहेत. इंडियन्स सोशल मुव्हमेंट ने आदिवासी पाड्यांचा सर्वे करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि शासकीय दरबारी निदर्शनास आणून देत याचा पाठपुरावा केला. आणि त्यासाठी प्रशासनाने सुद्धा दखल घेऊन कॅम्प घेण्याची तयारी दर्शवली. पुढील काळात जास्तीत जास्त प्रमाणात असे कॅम्प राबवून शासकीय दस्तावेज सहज पद्धतीने जनतेला उपलब्ध करून देण्याचं काम इंडियन्स सोशल मुव्हमेंट करेल जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ ते घेऊ शकतील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.