सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
प्रथम एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून रानसई गावात सुरू करण्यात आलेल्या ग्राम शिक्षा केंद्राचे उदघाटन रानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्याम लेंडे, संजय सर,रा.जि.प. शाळेच्या शिक्षिका जान्हवी कडू ,सुनिता म्हात्रे , आरोग्य सेविका दमयंती ठाकूर, कुष्ठरोगतज्ञ रामदास देसले तसेच प्रथम संस्थेचे CRL- काशिराम निरगुडे व जिल्हा समन्वयक DRL- प्रतिक खुंटे आणि माता- पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ग्राम शिक्षा केंद्रासाठी सरपंच गीता भगत आणि शालेय शिक्षिका जान्हवी कडू यांच्यातर्फे पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. सर्वप्रथम गावात रॅली काढली गेली या रॅली दरम्यान गावकऱ्यांच्या माध्यमातून सर्व वयोगटासाठी उपयुक्त ठरतील अशी पुस्तके ग्राम शिक्षा केंद्रासाठी दिली गेली.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सरपंच मॅडम म्हणाल्या की प्रथम संस्थेच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या ग्राम शिक्षा केंद्राचे अजून मोठ्या स्वरूपात रूपांतर करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जातील तसेच आपण या आमच्या अतिशय दुर्गम भागात जेथे नेटवर्क देखील उपलब्ध नाही अशा विभागात मुलांसाठी अतिशय उपयुक्त पर्याय उपलब्ध करून दिलात व याचा आमच्या गावातील सर्व स्थरातील वर्गाला खूप फायदा होईल असे सांगून प्रथम संस्थेचे सरपंचांनी आभार मानले. शेवटी प्रथम संस्थेचे मार्गदर्शन असेच मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून उपस्थितांना व आयोजकांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी कडू यांनी तर आभार कांशीराम निरगुडे यांनी मानले.








Be First to Comment