Press "Enter" to skip to content

सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यातील रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज सायन्स व कॉमर्स यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ” महिला सक्षमीकरण” या कार्यक्रमा अंतर्गत वेशभूषा स्पर्धा,एकांकिका व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एक लघुनाटिका हे सर्व कार्यक्रम सादर करण्यात आले .

उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . तसेच शाळेचे अध्यक्ष शेखर म्हात्रे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले .

रोटरी शाळेच्या PTA उपाध्यक्षा अर्चना सावंत , पालक शिक्षक संघटनेचे महिला सदस्य तसेच शाळेच्या ऍडमिन ऑफिसर पुष्पा कुरूप , प्राचार्य अक्षता घरत , मुख्याध्यापिका संजीता थळी व शिक्षक उपस्थित होते व त्यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.