प्रिझम सामाजिक विकास संस्थेचा पुढाकार
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
रेझिंग डे निमित्ताने यशवंतराव देशमुख कनिष्ठ माहाविद्याल चौक येथे प्रिझम सामाजिक विकास संस्थेचा माध्यमातून ऑन ड्युटी चोवीस तास हे पथनाट्ये सादर करण्यात आले.या माध्यमातून पोलीस दलाचे कार्य कसे असते.गुन्हेगारांवर वचक आणी सज्जनाला प्रेमाचा हात,त्याच बरोबर सर्वसामन्य जनतेला पोलीसांचे कार्याची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्दात विचारांतून पथनाट्ये सादर करून मांडण्यात आली.
या पथनाट्ये च्या माध्यमातून पोलीस काका,पोलीस दिदी हे सर्वसान्य जनेसाठी सदैव तत्पर असून काही समस्या निर्माण झाल्यास पोलीस हेल्पलाईन ११२ या नंबर वर संपर्क साधल्यास आपल्याला तातडीने मदत पोहचविण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे.त्याच बरोबर सायबर क्राईम होवू नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी? या विषयी सुद्धा जनजागृती पथनाट्यातून सादर करण्यात आली.
सदर पथनाट्याचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी यांच्या माध्यमातून पथनाट्ये सादर केले.यावेळी कलाकार म्हणून विनोद नाईक, अमृता शेडगे, प्रसाद अमृते, सागर पाटील, तुषार राऊळ, धनश्री मोरे, निशिता पाटील, मानसी पाटील, मानसी पोसरेकर, श्रीराम जांभळे आदी कलाकार सहभागी झाले होते. सदर हे पथनाट्ये रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे तपस्वी गोंधळी यांनी यावेळी सांगितले.यावेळी शाळकरी मुले, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment