Press "Enter" to skip to content

देवरे विद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण

सिटी बेल | रामकृष्ण पाटील | नंदुरबार |

नंदुरबार तालुक्यातील श्री आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील 15 ते 18 वयोगटातील 93 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय लहान शहादे येथील पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद नाईक, डॉ.पंकज कदम, डॉ. हेमांगी आगळे, स्त्री स्वास्थ्य अभ्यंगता श्रीम.बाविस्कर सिस्टर ज्योती जावरे, हिना वळवी, आरोग्य सेवक राकेश ठाकुर, श्रीम.ब्राह्मणे आशा वर्कर्स माधुरी पाटील,रत्ना पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व लसीकरण केले.

पथकातील सर्व पदाधिकारींचे विद्यालयातर्फे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी सन्माननीय केले.लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे उपशिक्षक के.पी.देवरे, डी.बी.भारती, एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल, व्ही.बी.अहिरे, एस.एच. गायकवाड, लिपिक आर.एम.पाटील, शिपाई एम.आर.भामरे,एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.