Press "Enter" to skip to content

कोल्हापूर येथे सन्मान सोहळा

जेष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड पुरस्काराने सन्मानित !

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

इमेज इंटरनॅशनल आॕनलाईंन रिसर्च सेंटर आणि कला, साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन व पुरस्कार वितरण सन्मान सोहळा कोल्हापूर शाहू महाराज सभागृहात पार पडला.

या पुरस्कार वितरण सन्मान सोहळ्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना गौरविण्यात आले.सम्यक सामाजिक संस्था ही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना महापुरुषांची जयंती,कोरोना संक्रमण काळात गोरगरीब जनतेला जिवनावश्यक सामान , कोरोना जनजागृती, जनतेला मोफत मास्क सॅनिटायझर पुरविणे,आरोग्य शिबीरे,रक्तदान शिबीरे, कोरोना काळात गरीब गरजूंना वैद्यकिय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न अशा सामाजिक परिवर्तनाची चमकदार प्रतिमा निर्माण करणारे रायगड जिल्ह्यातील सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश ग्यानोजी गायकवाड यांना रात्रीस खेलचाळे या मालिकेत आण्णा नाईक भुमिका साकारत असणारे सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी अभिनेते माधव अभ्यंकर यांच्याहस्ते प्रकाश गायकवाड यांना मानचिन्ह, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाळ व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांना या अगोदर ही सामाजिक क्षेत्रातील योगदानाबाबत अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नुकताच त्यांना कोल्हापूर येथे रात्रीस खेल चाले या मालिकेत अण्णा नाईक भुमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.