Press "Enter" to skip to content

सिटी बेल : प्रासंगिक लेख

महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांचे कुडपण येथे कौटूंबिक स्मारक ; राष्ट्रीय स्मारक होण्याची गरज

सिटी बेल | शैलेश पालकर |

6 फेब्रुवारी 1948 रोजी सुमारे 4000 पाकिस्तानी सैनिक आणि कबालींना नाईक कृष्णा सोनावणे यांनी घातले. या महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांचे राष्ट्रीय स्मारक त्यांचे जन्मगांव कुडपण येथे होण्याची मागणी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी केली आहे. याविषयी तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याकडे इंटरनेटद्वारे पाठपुरावा केला असता त्यांनी अनुकूलता दर्शविली होती. मात्र, महावीर चक्र प्राप्त सोनावणे यांच्या कुटूंबियांनी स्वतः पुढाकार घेऊन हे स्मारक स्वखर्चाने उभे केले आहे. आज महावीर चक्र प्राप्त दिवंगत नाईक कृष्णा सोनावणे यांचा शंभरावा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आहे. त्यानिमित्ताने हा प्रासंगिक लेख….

पहिल्या महार बटालियनमध्ये 1948 साली कृष्णा सोनावणे भरती झाले. त्यावेळी त्यांचे शिक्षण जेमतेम पहिली इयत्तेपर्यंत झाले होते. या काळात ब्रिटीशांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य देऊन नागरिकांना कोठे राहायचे ते ठरविण्याची मुभा दिली. परिणामी, फाळणीतून पाकिस्तानचा जन्म झाला. भारताला आणि काश्मीरला स्वातंत्र्य मिळाले. काश्मीरचा राजा हरिसिंह हा हिंदू राजा होता. त्यावेळी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरलमहमद अली जीना तर पंतप्रधान लियाकत अलिखान झाले. त्यामुळे कााश्मिंरचा राजा हिंदू आणि जनता माुस्लिंम असल्याने जीनांनी पाकिस्तानी फौज व कबाली यांना काश्मीरमध्ये घुसविले. पाकिस्तानी फौजा व कबालींनी सर्व काश्मीर जिंकत श्रीनगरपर्यंत मजल मारली.

काश्मीरच्या राजाची फौज अतिशय छोटीशी होती आणि काश्मीरचे पंतप्रधान मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला होते. हरिसिंह राजा आणि मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांना पाकिस्तानमध्ये सामील होण्याची इच्छा नव्हती. त्यांनी भारताचे पंतप्रधान पं. नेहरुंकडे भारतात सामीलहोण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यावेळी भारतातून काश्मीरला जाण्याचे रस्ते अतिशय अवघड होते. जनरल थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फौजा पूर्ण काश्मीरवर आक्रमण करण्यासाठी आणि पाकिस्तानच्या फौजा हटविण्यासाठी तेथे पोहोचली. हवाईमार्गे श्रीनगरपर्यंतही भारतीय सैन्य पोहोचले. येथेच पहिले भारत -पाकिस्तान युध्द पेटले.

महार युनिटची पहिली बटालियन सर्वात आधी श्रीनगरला गेली तर दुसरी बटालियन सीमावर्ती भागात पाठविण्यात आली. झांगड हा त्यापैकी सर्वात दुर्गम आणि बर्फाळ प्रदेश होता. तेथे ब्रिगेडीयर उस्मानच्या क्रमांक 1 बटालीयनच्या वाय कंपनीमध्ये नाईक कृष्णा सोनावणे दाखलझाले. त्यांचे नेतृत्व ब्रिगेडीयर उस्मान यांच्याकडे होते. झांगडच्या मोर्चावर नाईक कृष्णा सोनावणे दोन मशीनगनसह उंच टेकडीवर पोझीशन घेऊन बसले. ब्रिगेडीयर उस्मान मुसलमान असल्याने पाकिस्तानच्या जनरलने त्याला पाकिस्तानशी हातमिळवणी केल्यास मोठे पद आणि सन्मान देण्याचे आमिष दाखवले.

पाकिस्तानची ही चालपाहून ब्रिगेडीयर उस्मानने स्वत: एक चाल खेळली. त्याने पाकिस्तानशी बोलणी सुरु ठेवली आणि भारतीय सैन्याची पुरेशी रसद झांगड मोर्चावर जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत पाकिस्तानच्या जनरलसोबत वार्तालाप सुरु ठेवला. मात्र, झांगडच्या लढाईमध्ये अनेक शूर महार सैनिक कामी आले याची आठवण मनाशी बाळगून पाकिस्तान सैनिक आणि कबालींना कंठस्नान घालण्यासाठी महार रेजिमेंटचा प्रत्येक महार लढवय्या आसुसलेला होता. नाईक कृष्णा सोनावणे यांनी भरपूर हँडग्रेनेडस्, बुलेटस् सोबत घेऊन जीवात जीव असेपर्यंत पाकिस्तानी फौजांना पुढे येऊ द्यायचे नाही असा निर्धार केला.

6 फेब्रुवारी 1948 रोजी पाकिस्तानी सैन्याने 7 हजार जवानांसह चालकेली. त्यामुळे भारतीय सेनेचा जोर कमी पडला आणि भारतीय फौज मागे हटली. स्वत:ची आणि याचवेळी जखमी झालेल्या लान्स नाईक पुंडलिक महार याची अशा दोन मशिनगन घेऊन नाईक कृष्णा सोनावणेंनी उंचावर जागा हेरली. तेथून पाकिस्तानी सैन्य अगदी नजरेच्या टापूत दिसत होते. कृष्णा सोनावणेंनी प्रति आक्रमण केले.

तब्बल तासां-दीड तासात दोन मशीनगन्समधून हजारो गोळयांचा वर्षाव आणि हॅण्डग्रेनेडस्चा मारा यामुळे सुमारे चार हजार पाकिस्तानी सैनिक आणि कबाली घुसखोर ठार झाले. ब्रिगेडीयर उस्मान याने नाईक कृष्णा सोनावणेंचे हे एकटयाचे पाकिस्तानसोबतचे युध्द पाहिले. कृष्णा सोनावणेंच्या हाताला गोळी लागली तरी ते डगमगले नाहीत. त्यांचे चार जवानही धारातीर्थी पडले. पण सह्याद्रीच्या कुशीत कुडपणच्या थंड हवेत जन्मलेल्या या जवानाने काश्मीरच्या बर्फामध्येही आपल्या आसीम शौर्याने पाकिस्तानचे चार हजार सैनिक मारले. त्यामुळे आक्रमण करणाऱ्या कबालींना पाकसैन्यासोबत माघार घ्यावी लागली, ही घटना त्यावेळी दिल्लीमध्ये जनरलकरिअप्पा यांच्या कानावर ब्रिगेडीयर उस्मानने घातली.

सुभेदार बी. जी. मोरे 2 महार बटालियनमध्ये तर नाईक कृष्णा सोनावणे 1 महार बटालियनमध्ये होते. दोघे काही काळ मध्यप्रदेशातीलसागर मुक्कमी एकाच सैनिकी तळामध्ये राहत होते. त्यावेळी कृष्णा सोनावणे यांनी आपली ही गौरवगाथा बी. जी. मोरे यांना सांगितली. हाताला गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत नाईक कृष्णा सोनावणे यांची त्यांच्या शौर्याबद्दल जनरल करिअप्पा यांनी महावीर चक्र पदकाच्या सन्मानासाठी घोषणा केली.स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी नाईक कृष्णा सोनावणे यांना त्यांच्या शौर्याबद्दल सर्वोच्च महावीर चक्र पदक प्रदान करून सन्मानित केले. यानंतरही सुभेदार मेजर पदावरून 1962 भारत -चीन युध्द व 1965 भारत-पाकिस्तान दुसरे युध्द यात सहभागी होऊन देशसेवा केली. त्यामुळे रँकिंगने कनिष्ठ असूनही त्यांना सुभेदार बी. जी. मोरे सॅल्यूट ठोकत असत. प्रत्यक्ष भेटीतही नाईक कृष्णा सोनावणे यांचा उल्लेख आदराने ‘साहेब’ असा करीत असत.

क्रमांक 1 बटालीयनच्या वाय कंपनीमध्ये सुभेदार मेजर पदावरून निवृत्त होत सागर लष्करी तळावर महार रेजिमेंट युध्दसराव देणारे महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे अतिशय नम्रभावाने साधेपणाने राहात असत.नंतर मुंबई पोलीस दलात हत्यारी पोलीस म्हणून सेवा बजावली. या महावीराचे निधन 29 डिसेंबर 1997 रोजी मुंबई येथील राहत्या घरी झाले. यानंतर ‘पोलादपूरचे पोलादी पुरूष’पुस्तकासाठी माहिती संकलीत करणाऱ्या प्रस्तुत प्रतिनिधीने या महायोध्द्याचे राष्ट्रीय स्मारक कुडपण जन्मगावी व्हावे, यासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांच्याकडे इंटरनेटवरून पाठपुरावा केला. त्यावर संबंधित बाब आपण डीफेन्स मिनिस्ट्रीकडे पाठविली असून याबाबत लवकरच निर्णय कळविण्यात येईल असा रिप्लाय राष्ट्रपतीमहोदयांनी पाठविला.

1929 साली कुडपण अतिदूर्गम भागात जन्मलेले नाईक कृष्णा सोनावणे पोलादपूरच नव्हे तर महाराष्ट्रवासियांचा अभिमान असल्याचा उल्लेख 1990 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी करून ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. मध्यप्रदेशात महार रेजिमेंटने या महावीराचे यथोचित स्मारक उभे केले आहे. पुतळा उभारलाय आणि सर्व माहिती देणारे केंद्रही उभारले आहे. एका रस्त्यालाही सोनावणे मार्ग नांव देऊन इतिहास जिवंत ठेवलाय. अलिकडेच कुडपण ते मध्यप्रदेशातील सागर येथील महार रेजिमेंटपर्यंत शौर्य यात्रा टाटा नॅनोतून करणारे पोलादपूरचे एलआयसी ऍडव्हायझर सुभाष अधिकारी यांनी महावीराच्या स्मृती जरूर जागविल्या.

देशासाठी पोलादपूर तालुक्यातील नररत्नांनी प्राणाची आहुती दिली अनेकांनी शौर्याची परिसीमा गाठली, अशांचे चिरस्मरण होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी शहिदस्तंभासह शौर्य स्मारकाची उभारणी करण्याची मागणी केली आहे.
मात्र, गेल्या वर्षी 29 डिसेंबर 2017 रोजी महावीरचक्र कृष्णाजी सोनावणे यांच्या 20 व्या स्मृतीदिनी कुडपण बौध्दवाडीतील निवासस्थानी कुटूंबियांनी कौटूंबिक स्मारक उभारून तालुक्यासाठी एका चांगल्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले आहे. मात्र, राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी नाईक कृष्णा सोनावणे यांना त्यांच्या शौर्याबद्दल सर्वोच्च महावीर चक्र पदक प्रदान करून सन्मानित केले म्हणून राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करून महावीरचक्र कृष्णाजी सोनावणे यांच्याप्रती राज्य आणि केंद्र शासनातर्फे यथोचित आदरभाव व्यक्त करण्याची आवश्यकता आहे.

1929 साली कुडपण अतिदूर्गम भागात जन्मलेले नाईक कृष्णा सोनावणे पोलादपूरच नव्हे तर महाराष्ट्रवासियांचा अभिमान असल्याचा उल्लेख 1990 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी करून ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. मध्यप्रदेशात महार रेजिमेंटने या महावीराचे यथोचित स्मारक उभे केले आहे. पुतळा उभारलाय आणि सर्व माहिती देणारे केंद्रही उभारले आहे. एका रस्त्यालाही सोनावणे मार्ग नांव देऊन इतिहास जिवंत ठेवलाय.

अलिकडेच कुडपण ते मध्यप्रदेशातील सागर येथील महार रेजिमेंटपर्यंत शौर्य यात्रा टाटा नॅनोतून करणारे पोलादपूरचे एलआयसी ऍडव्हायझर सुभाष अधिकारी यांनी महावीराच्या स्मृती जरूर जागविल्या. देशासाठी पोलादपूर तालुक्यातील नररत्नांनी प्राणाची आहुती दिली अनेकांनी शौर्याची परिसीमा गाठली, अशांचे चिरस्मरण होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी शहिदस्तंभासह शौर्य स्मारकाची उभारणी करण्याची मागणी केली आहे.

मात्र, गेल्या वर्षी 29 डिसेंबर 2017 रोजी महावीरचक्र कृष्णाजी सोनावणे यांच्या 20 व्या स्मृतीदिनी कुडपण बौध्दवाडीतील निवासस्थानी कुटूंबियांनी कौटूंबिक स्मारक उभारून तालुक्यासाठी एका चांगल्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले आहे. मात्र, राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी नाईक कृष्णा सोनावणे यांना त्यांच्या शौर्याबद्दल सर्वोच्च महावीर चक्र पदक प्रदान करून सन्मानित केले म्हणून राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करून महावीरचक्र कृष्णाजी सोनावणे यांच्याप्रती राज्य आणि केंद्र शासनातर्फे यथोचित आदरभाव व्यक्त करण्याची आवश्यकता आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.