Press "Enter" to skip to content

गोपाळ म्हात्रे महाराष्ट्र प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन रिसर्च सेंटर व समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने लोकसंवाद प्रतिमा संमेलन यांच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त प्रतिभावंतांचा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे पार पडला.

यामध्ये महाराष्ट्रा मधून काना कोपऱ्यातून कला साहित्य सामाजिक क्रीडा यामध्ये नैपुण्य मिळविलेल्या मान्यवरांना महाराष्ट्र प्रतिभा गौरव पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये गोपाळ दिनकर म्हात्रे सारडे- उरण व रोहित शरद घरत विंधने- उरण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरणासाठी प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर, जेष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड,पुणे मॅनेजिंग डायरेक्टर अविल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे निसार सुतार , पंच गण्य तज्ञ-विवेकानंद जितकर,संस्थेचे अध्यक्ष बि. एन खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.