Press "Enter" to skip to content

खालापूर तहसील कार्यालयात सुप्रशासन सप्ताह

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

२० डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत खालापूर तहसील कार्यालया मार्फत सुप्रशासन सप्ताह साजरा करण्यात येत असून जनतेने आपल्या अडीअडचणी तक्रार पेटीत द्याव्यात असे आवाहन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.

केंद्र सरकारने यावर्षी २० ते २५ डिसेंम्बर २०२१ या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यासाठी ही राष्ट्रीय मोहीम राबवित आहे.या तक्रारीचे निवारण करीत असताना आलेले अनुभव व अडचणी या तक्रारी निवारण झाल्याची यशोगाथा संबंधित कार्यालयात व शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.

तक्रारींचे निवारण,सेवा वितरण यात पारदर्शकता व गतिमान आणण्याच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन सरकार च्या वतीने करण्यात आले आहे,असे तहसीलदार यांनी सांगितले. तालुका ठिकाणी, मंडळ निरीक्षक व तलाठी यांनीही याबाबत जनतेला अवगत करण्याचे आहे.खालापूर तालुक्यातील जनतेने याबाबत जागरूकता ठेऊन आपल्या तक्रारी तहसील कार्यालयातील तक्रार पेटीत टाकाव्यात व शासनाला या कार्यात मदत करावी,आपल्या अडचणी सोडून घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार आयुब तांबोळी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.