Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यात धुक्या समवेत थंडीची लाट

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

गेले अनेक दिवस वातावरणात सातत्याने गारवा निर्माण होत असल्यामुळे रायगड जिल्ह्यात जोरदार थंडी पडू लागली आहे.दुपारी एक – दोन वाजेपर्यंत थंड वातावरण निर्माण झाल्यामुळे उबदार कपडे घालण्यात पसंती दर्शवित आहे.पहाटे थंडी आणी धुके यांच्या मुळे वाहन चालकांस वाहन धीम्या गतीने चालवावी लागत आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंत धुके असल्यामुळे समोरील वाहनांचा अंदाज घेणे कठीण जात होते.वातावरणात सातत्याने बदल घडत असल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असले तरी सुद्धा नागरिक या गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे.

सकाळी वातावरणात धुके आणी सायंकाळ झाली का जोरदार थंडी पडत आहे.तसेच पहाटे या धुक्यातून वाट काढले वाहनचाकांस अवघड जात आहे.धुके निर्माण झाल्यामुळे,बळीराजाला दिलासा मिळाला आहे.शेतात लावलेल्या कडधान्ये यांना पोषक द्रव्ये मिळत आहे.तालुक्यातील शेतकरी वर्ग पावसाळी भात शेती करीत असली तरी हिवाळी कडधान्ये पिके घेत असतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.