कामगार नेते महेंद्र घरत यांच्या NMGKS संघटनेने केली पगारवाढीच्या कराराची हॅट्रीक
सिटी बेल | शेलघर |
एकीकडे कंपन्या बंद पडत चालल्या आहेत, परंतु ह्याच परिस्थितीत कंपनीबरोबर कामगारही टिकला पाहिजे या हेतूने योग्य सांगड घालत कामगार नेते तथा रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून एकाच दिवसात तब्बल तीन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार आज करण्यात आले.

बकुल ऍरोमॅटीक्स रसायनी मधील कामगारांसाठी ७६००/- रुपये तर मॅग्नम ट्रेडर्स चिंचवण मधील कामगारांसाठी ५०००/- व मास्टर मरीन सर्व्हीसेस (PUB व CMA) मधील कामगारांसाठी ४०००/- पगारवाढीचे करार करण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष संजय ठाकूर, संघटक योगेश रसाळ, विवेक म्हात्रे, उत्तम पाटील, आनंद ठाकूर तर बकुल व्यवस्थापनाचे गजानन गायकवाड, दिलीप पै तर मास्टर मरीन सर्व्हीसेसचे सौ. बिंद्रा देवराजन, नंदकुमार बने, विलास शिरोळे, मॅग्नम ट्रेडर्सचे डायरेक्टर अनिल खुबचंदानी, ज्ञानदेव जाधव तर कामगारांतर्फे परेश थळी, चेतन खाने, अक्षय म्हात्रे, प्रसाद खाने, प्रतिक खाणे, महेश घरत, जगदीश चौधरी, दत्ता ठोंबरे उपस्थित होते.








Be First to Comment