Press "Enter" to skip to content

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरुच

जेएनपीटीने केरवला फाऊंडेशन बरोबरचा करारच रद्द करावा : जिप सदस्य विजय भोईर

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |

केरवला फाऊंडेशन प्रशासनाने प्राथमिक विभागाच्या प्रिन्सिपॉला सक्तीच्या रजेवर
पाठविण्याचा व शाळेच्या आवारात फिरण्यास अथवा प्रवेश करण्यासबंदी केल्याचा आदेश काढला हा प्रकार खूपच धक्कादायक आहे.अशाच प्रकारे या अगोदर अॅडव्हान्स ऐवजी पूर्णपगार देण्याची
मागणी केलेल्या शिक्षकांच्या सदर्भात घडला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.तेव्हा अशा प्रशासनाला धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर कदाचित येथील प्रकल्पग्रस्तांच्या
विध्यार्थ्यांना फी मध्ये मिळणारी अर्धी सवलत देखील बंद होण्याची श्यक्यता आहे. जेएनपीटीने रुस्तम केरवला फाऊंडेशन बरोबरच करारच रद्द करावा.व
गेली 30 वर्षे आयईएस ही संस्था व्यवस्थितपणे आपले काम करीत होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि जेएनपीटी प्रशासना मध्ये एक विश्वासाचे अतूट नाते निर्माण झाले होते. त्यांनाच पुढे शाळा सुरु करण्यासाठी मान्यता द्यावी असे प्रतिपादन जिप सदस्य विजय भोईर यांनी मार्गदर्शन करताना केले.

जेएनपीटी प्रशासनाने 1 जुलै 2019 रोजी जेएनपीटी वसाहती मधील गेली 30 वर्षे सुरू असलेल्या आयईएस या शिक्षणसंस्थेचा करार संपुष्टात आल्या नंतर जे.एन.पी.टी.ने नवीन निविदा प्रक्रिया करून त्याठिकाणी रुस्तमजी केरावाला फाऊंडेशन मुंबईया या शैक्षणिक संस्थेबरोबर नवीन करार केला.आयईएस संस्था ते रुस्तमजी केरावला फाऊंडेशन या दोन्ही शैक्षणिकसंस्थामध्ये आजपर्यंत हस्तांतरणीय करार झालेला नसतानाही दोन वर्षाच्या कालावधीतच
रुस्तमजी केरावाला फाऊंडेशनने शाळांच्या इमारतींना टाळे ठोकून शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक आणि प्रकल्पग्रस्थांवर अन्याय केला आहे. केरावला फाऊंडेशनच्या मनमानी करभारा विरोधात आज शिक्षकनेते नरसू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या प्रवेशव्दारा समोर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी धरणे आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनाला
आज परिसरांतील मान्यवरासह पालकांनी पाठींबा जाहीर केला आहे.

यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील म्हणाले की. गेल्या दोन वर्षात केरावला फाऊंडेशनने सुमारे 600 स्थानिक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला आहे.आयईएसच्या विद्यालयात प्रतिवर्षी के.जी.ते माध्यमिक विभागात सुमारे 800 ते 900 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.परंतु केरावला फाऊंडेशन
2020—2021 व 2021—2022 या शैक्षणिक वर्षात एकही नवीन प्रवेश दिला नाही ही शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान तर झालेच परंतु प्रकल्पग्रस्थाना अर्ध्या फी माफीची सवलत असल्याने त्यापासून ही वंचित ठेण्याचे काम केरवला फाऊंडेशनने केले असल्याने त्यांचेही नुकसान झाले.आता वेळेवर फी भरली गेली नाहीतर पाल्याला विद्यालयांतून काढून टाकणार की काय ? या भीतीमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर इंग्रजी माध्यमाची शाळा बंद पडली तर या माध्यमात शिकविणाऱ्या शिक्षकांना ही आपल्या नोकरीला मुकावे लागणार असल्याने तेही चिंतातूर
आहेत. या प्रश्नाचा जाब जेएनपीटीच्या संबधीत अधिकाऱ्यांना विचारणार असल्याचे जेएनपीटीचे कामगार विश्वस्थ भूषण पाटील यांनी सांगितले.

आज जे.एन.पी.टी.विद्यालयाच्या प्रवेशव्दारावर आंदोलनासाठी बसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्त्या उल्का
महाजन, एल.बी.पाटील, मेघनाथ तांडेल, जगजीवन भोईर, जीवन गावंड, दर्शन घरत, नितीन पाटील, कॉ.संजय ठाकूर, रामचंद्र म्हात्रे, सचिन दाभाडे, अॅड.अमर पाटील, अॅड.रत्नदीप पाटील, रमाकांत म्हात्रे, रविंद्र पाटील, विकास कडू, समाजिक कार्यकर्ते संतोष पवार, पालक संघर्ष समितीचे
अध्यक्ष किरण घरत, राजेंद्र मढवीसर, सुरेश पाटील, अभिजित मोकल, हर्षल ठाकूर, संदीप पाटील, सौ.रेखा घरत, रंजना पडते यांच्यासह पालकवर्गही मोठया संख्येने उपस्थित होते.याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.