Press "Enter" to skip to content

दि.बा महोत्सव उत्साहात संपन्न

एकविरा कला संस्था च्या माध्यमातून पहिल्या दिबा महोत्सव 2021 चे आयोजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

केळवणे येथील तरुण युवक तेजस पाटील(अभिनेता, दिग्दर्शक) आणि त्यांच्या एकविरा कला संस्था च्या माध्यमातून पहिल्या दिबा महोत्सव 2021 चे आयोजन मोठ्या थाटामाटात उरण तालुक्यातील जासई येथे पार पडले. या महोत्सवाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.

विमानतळ नामंकरण कृती समीती अध्यक्ष दशरथ पाटील,जे.डी.तांडेल,दिबा साहेबांचे चिरंजीव अभय शेठ पाटील,अतुल शेठ पाटील, अविशेठ पाटील, बाळा शेठ पाटील, भाई सुभाष घरत,भाई शेठ पाटील ,यशवंत शेठ घरत,उपमहापौर जगदीश दादा गायकवाड,उपसभापती पंचायत समीती इगतपुरी विठ्ठल शेठ लंगडे,गोपीनाथ शेठ म्हात्रे,हायस्कूल प्राचार्य घाग सर,नूरा शेख,ह.भ.प धावजी शेठ पाटील,बहूजन विकास आघाडी अध्यक्ष संतोष घरत, आगरीकोळी संगीत चा बादशहा सोमनाथ कोळी,गायक जितू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.तसेच पारंपरिक दिंडी, बैलगाडी, वारकरी संप्रदायाचे रथद्वारे वारकरी, शाळकरी तसेच सहा जिल्ह्यातील भुमीपूत्र व ग्रामस्थ यांनी उत्साहात मिरवणूक काढली होती.

जासई येथील महिलांच्या पारंपरिक फेऱ्यांच्या नृत्याने सुरुवात झाली.या महोत्सवात दिबा निबंध स्पर्धा, दिबा गायन स्पर्धा, दिबा चित्रकला स्पर्धा, दिबा वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, नाशिक, मुंबई येथील अनेक लहान मुलांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धा विषय हा लोकनेते दिबा पाटील साहेब होता.तसेच या महोत्सवात भुमीपूत्र विमानतळ करिअर मार्गदर्शन चे आयोजन केले होते.सोबत भुमीपूत्र काव्य संमेलन आयोजित केले होते त्यामध्ये अनेक कवींनी सहभाग घेतला होता.

सहा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 25 भुमीपूत्रांना भुमीपूत्र सन्मान 2021 व 15 भुमीपूत्र व भुमीकन्यांना एकविरा कला संस्था सन्मान 2021 ने व 8 संघटनांना दिबा सामाजिक सन्मान 2021ने व 2 कलाकारांना दिबा कला सन्मान 2021ने सन्मानित करण्यात आहे.

तेजस पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावना भाषणात महोत्सवाचा उद्देश सांगितला.नवी मुंबई विमातळाला नाव फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचेच पाहिजे. विमानतळाशी संबंधित नोकरीत 90% अधिकार फक्त स्थानिक भुमीपूत्रांचाच आहे. तसेच विमानतळाशी संबंधित नोकरी चे प्रशिक्षण देण्यासाठी उरण पनवेल तालुक्यात तंत्रशिक्षण महाविद्यालय झालाच पाहिजे. आणि महोत्सवात लहान मुलांच्या स्पर्धा घेण्याचे कारण म्हणजे येणाऱ्या पिढी ला लोकनेते दि.बा.पाटील साहेब माहिती झाले पाहिजेत.असे तेजस पाटील यांनी सांगितले.
दशरथ पाटील,जे.डी.तांडेल,उपमहापौर जगदीश दादा गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

हा महोत्सव पार पाडण्यासाठी महात्मा फुले चारिटेबल ट्रस्ट, जिजामाता चारिटेबल ट्रस्ट, ग्रामपंचायत जासई,छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल जासई,रा.जि.प.शाळा जासई,क्रांती महिला मंडळ, सावित्रीबाई महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ जासई यांनी मोलाचे सहकार्य केले. आभार प्रदर्शन भाई सुभाष घरत यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.