Press "Enter" to skip to content

होम टू होम प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकाप राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी युवा नेते अनिकेत तटकरे यांची पालीत दमदार प्रचार रॅली

पालीतील जनता सुज्ञ, आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल : आमदार अनिकेत तटकरे यांचा विश्वास

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

पालीतील जनता सुज्ञ असून विकासाचा दृष्टिकोन ठेवून आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला. 

पाली सुधागडसह  सर्वत्र नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली सर्वशक्ती व अक्कल हुशारी पणाला लावून रणमैदानात उतरले आहेत.  पाली नगरपंचायत निवडणूक ही विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची अस्तित्वाची लढाई मानली जातेय. या निवडणुकीत शेकाप व राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून 13 प्रभागात उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी युवा नेते तथा आमदार अनिकेत तटकरे , शेकाप नेते सुरेशशेठ खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा 

यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकाप राष्ट्रवादी आघाडीचा विजय असो विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला. निवडणुकीच्या प्रसार प्रचार प्रक्रियेत आजी माजी आमदार, खासदार, मंत्रीगण सहभागी झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की शेकाप व राष्ट्रवादी आघाडीला पाली सुधागड वासीय जनतेने नेहमीच सहकार्य केले आहे. पाली शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास घडविण्याचा आमचा दृष्टिकोन आहे, अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास करताना जनतेला मूलभूत व पायाभूत नागरि सेवासुविधा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. पालीचा मतदार सूज्ञ आहे. जनता  आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास आ.तटकरे यांनी व्यक्त केला. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.