Press "Enter" to skip to content

पालीत शिवसेने विरोधात राष्ट्रवादी, शेकाप आघाडी

पालीत नगरपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू, पालकमंत्री आदिती तटकरे व धैर्यशील पाटील यांचा होम टू होम प्रचार

जनतेने विकासकामांना प्राधान्य देऊन शेकाप – राष्ट्रवादी आघाडीला सत्तेत संधी द्यावी : पालकमंत्री आदिती तटकरे  

बल्लाळेश्वराच्या दर्शनाने शेकाप राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराचा फुटला नारळ

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

पाली नगरपंचायत निवडणुकीत जनतेने विकासकामांना प्राधान्य देऊन शेकाप व राष्ट्रवादी आघाडीला सत्तेत संधी द्यावी असे आवाहन राज्यमंत्री तथा  पालकमंत्री आदिती तटकरे केले. पालीत शिवसेना विरुद्ध शेकाप राष्ट्रवादी लढत आहे यावर तटकरे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या सेवेसाठी अविरत काम करणारे भक्कम सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे मित्रपक्ष आहेत ते जनतेच्या सेवेत विकासाच्या मुद्द्यावर काम करीत आहेत असे तटकरे यांनी स्पष्ट केले. 

स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत व पोटनिवडणुकीत स्थानिक परिस्थितीनुसार राजकीय समीकरण व निवडणुकीची रणनीती ठरवली जाते. महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या सेवेसाठी अविरत काम करणारे भक्कम सरकार आहे असे  ना: आदिती तटकरे यांनी याप्रसंगी सांगितले. 

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील राजकीय , सामाजिक व धार्मिकदृष्ट्या  अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पाली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या प्रसार प्रचार प्रक्रियेत आजी माजी आमदार, खासदार, मंत्रीगण सहभागी झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. 

राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदितीताई तटकरे व माजी आमदार धैर्यशील दादा पाटील  यांचे उपस्थितीत शेकाप – राष्ट्रवादी आघाड़ी चे उमेदवार प्रभाग क्रमांक 11सौ.माधुरी अमीर वरंडे,प्रभाग क्र 12 सौ नलिनी गणेश म्हात्रे, प्रभाग क्र:  15 सौ रचना रवींद्र जाधव यांचे प्रचारार्थ नारळ वाढवण्यात आला. सर्वप्रथम अष्टविनायक बल्लाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांसह नेतेमंडळींनी होम टू होम  प्रचार फेरी काढली. व पत्रके वाटप करण्यात आली.

यावेळी प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी व आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की अष्टविनायक बल्लाळेश्वर तीर्थक्षेत्र विकास व शहरातील वाढती लोकवस्ती, पाली गावाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन आम्ही नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात विविध विकासकामांचा वचननामा  घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. सुधागड तालुका क्रीडा संकुल, तसेच प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय, अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा, नागरिकांना मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा , शहरातील अंतर्गत रस्ते, पार्किंग व्यवस्था, भाविक व भक्तांना चांगल्या सोयीसुविधा  आदी लोकाभिमुख विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमीका घेऊन  आम्ही निवडणूक लढवीत आहोत. जनतेने विकासाला प्राधान्य देऊन शेकाप राष्ट्रवादी आघाडीला सत्तेत संधी द्यावी. असे आवाहन पालकमंत्री ना. तटकरे यांनी केले. 

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शेकाप व राष्ट्रवादी अशी लढत होत आहे, यावर बोलताना पालकमंत्री तटकरे म्हणाल्या की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनावाखाली काम करीत आहोत. स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत व पोटनिवडणुकीत स्थानिक परिस्थितीनुसार राजकीय समीकरण व निवडणुकीची रणनीती ठरवली जाते. ओबीसी च्या उमेदवार पेचावर बोलताना सदर बाब ही न्यायालयीन बाब असून लवकरच हा पेच सुटेल सर्वसामान्य घटकाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ना. तटकरे यांनी व्यक्त केले. 

यावेळी शेकाप नेते तथा माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की, शेकाप नेते जयंत पाटील व खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पाली नगरपंचायत निवडणूक शेकाप राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवली जात आहे, पाली सह सुधागड तालुक्यात शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध  समाजाभिमुख विकासकामे केली आहेत, नगरपंचायत निवडणुकीत लोकाभिमुख चेहरे निवडणूक रिंगणात उभे आहेत, जनतेने या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. 

यावेळी शेकाप नेते सुरेशशेठ खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा, राष्ट्रवादी सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, ग.रा.म्हात्रे, माजी सभापती साक्षी दिघे,राष्ट्रवादी सुधागड तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर,पंचायत समिती सदस्य सविता हंबीर, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष सुजाता वडके, सुधागड तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे,तालुका चिटणीस उत्तमराव देशमुख, राजाराम देशमुख, राजेश गोळे, शेकाप पाली शहर अध्यक्ष जनार्दन जोशी, पराग मेहता, सुधीर साखरले, युवक जिल्हाध्यक्ष आरिफ मणियार, संजोग शेठ ,पप्पू परबलकर, सुनिल गायकवाड, प्रकाश आवासकर, विठ्ठल सिंदकर, शशिकांत पाशीलकर, संतोष धाटवकर, अशोक शहा, योगेश शहा, विनायक जाधव,शशिकांत दंत, दीपक पवार, विनायक जाधव, सचिन साठे, रवी जाधव, अमित वरंडे,आरिफ मणियार, सुधीर साखरले, सुलतान बेनसेकर, मह्म्मदभाई धनसे, ललित ठोंबरे,महेश खंडागळे, किरण खंडागळे,  इसाक पानसरे, विनय मराठे, इम्प्तीयाज  पठाण, आदींसह शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.