Press "Enter" to skip to content

स्वावलंबन संस्थेच्या “स्वावलंबन क्वीन” स्पर्धेचे ग्रँन्ड फिनाले संपन्न

महिला सक्षमीकरणासाठी स्वावलंबन सामाजिक संस्थेच्या कार्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार : महेंद्र घरत जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

सिटी बेल | कर्जत |

स्वावलंबन संस्थेच्या मार्फत वसंत सुष्टी कर्जत येथे संस्थेच्या “स्वावलंबन क्वीन” स्पर्धेचे ग्रँन्ड फिनाले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन रायगड काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत उपस्थित होते.

यावेळी महेंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, समाजातील दलित,आदीवाशी,वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्थाना अर्थिक पाठबळ देण्याचे काम आम्ही यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्थेमार्फत करत आहोत.आम्ही त्या घटकांपर्यत प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही तिथे या संस्था पोहचतात त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांचे कष्ट,मेहनत मार्गी लावण्यासाठी सर्व घटकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे असे ते यावेळी आपल्या मनोगतामध्ये संगितले.

महिलांसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वावलंबन संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा प्रभारी सौ. चारूलता टोकस, सहप्रभारी श्रीरंग बरगे, महिला अध्यक्षा श्रद्धाताई ठाकूर, मिलिंद पाडगावकर,स्वावलंबन संस्थेच्या सौ.विभा परब व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.