Press "Enter" to skip to content

मनसेचे अलिबाग येथे समुद्रकिनारे स्वच्छ अभियान

महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय : अरविंद गावडे

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. परदेशातील समुद्र किनारे इतके स्वच्छ आणि सुंदर का असतात असं कोणालातरी मनात वाटतच असेल, आपल्या राज्यातील का असू शकत नाही. आपल्याला एकत्र येऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे,”असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे यांनी अलिबाग येथे समुद्रकिनारे स्वच्छ अभियान कार्यक्रमात केली.
  

केवळ सरकारवर अवलंबून नको”फक्त सरकारवर अवलंबून न राहता आपण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जगभरातील विविध देशात समुद्राचे आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोहीम राबवली जाते. सर्वसामान्य लोकही याबाबत जागरुक आहेत आणि त्यांना याबाबतची जाण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहे. ही मोहीम महाराष्ट्रातील ४० समुद्र किनाऱ्यांवर आज ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राबवण्यात आली आहे.

परदेशात असलेली समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर का असतात ? आणि आपल्या राज्यात ते का असू शकत नाही ? आपले समुद्र किनारे अस्वच्छ आणि भकास का दिसतात? त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. फक्त सरकारवर अवलंबून न राहता, आपल्याला जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जगभरातील विविध देशांत समुद्र आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

सर्वसामान्य लोकही याबाबत जागरुक आहेत आणि त्यांना याबाबतची जाण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना अख्या महाराष्ट्रात राबवणार आहे. जर आपल्या जवळचे समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असावेत अशी तुमचीही इच्छा असेल, तर आमच्या या मोहीमेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा.असे आवाहन अरविंद गावडे यांनी यावेळी केले.  आपल्या सर्वांच्या मेहनतीनं हे समुद्र किनारे स्वच्छ होतील,असेही गावडे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.