Press "Enter" to skip to content

खा.सुनील तटकरे, राज्यमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या हस्ते रोरो बोटीच्या संकल्प प्रतिमेचे अनावरण

रो रो बोट सेवेचे नाव कोकण गौरव ठेवले आहे हि अभिमानाची बाब : पालकमंत्री नाम अदितीताई तटकरे

रोरो बोटीची संकल्पना कोकणा साठी ऐतिहासिक पाऊल खा. सुनील तटकरे

सिटी बेल | श्रीवर्धन | विजय गिरी |

रोरो बोटीची सेवा सुरू करणे म्हणजे कोकणच्या दृष्टीने महत्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल असल्याचं मत खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. खा. सुनील तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते रोरो बोटीच्या संकल्प प्रतिमेचे अनावरण पुनीर गौरव येथे संपन्न झालं. यावेळी मा.हर्डीकर, गौतम प्रधान, शशि महाडकर, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकणाच्या दृष्टीने महत्व पूर्ण पाऊल टाकत एका क्रांतिकारक बदलाची सुरवात आज आमच्या उपस्थितीत होत असल्याचं मत खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र, श्रीमंत पेशवे यांचं जन्मस्थान श्रीवर्धन व सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर याठिकाणी पर्यटक मोठ्यासंख्येने येत असतात. त्यांना याठिकाणी आल्यानंतर वेळ अपुरी पडत असते त्यांची जलदगती प्रवासाची भूक आपण भागवत आहात. आपण रोरो सेवा देण्याचा संकल्प सोडलेला आहे या संकल्पाची सिद्धी झालीच पाहिजे व लवकरात लवकर रोरो बोट सेवा सुरू झाली पाहिजे त्यासाठी केंद्रातून लागणाऱ्या परवानगी साठी अडचण आल्यास मला सांगा राज्यात काही मदत हवी असल्यास पालकमंत्री यांना सांगा आम्ही सहकार्य करू असे आश्वासन यावेळी खा. सुनील तटकरे यांनी दिली.

यावेळी पनीर गौरव प्रकल्प पाहून मन आकर्षित करणार हे प्रकल्प मुंबई मधील प्लॅट बंदीस्त जीवन जगणार्यांनी येथे येऊन आपल्या हक्काच्या घरात राहाव अस म्हणत प्रकल्पची स्तुती केली. यावेळी मुंबई ते अलिबाग बोट सेवेमुळे अलिबाग हे महाराष्ट्रापुरते पसंतीचे ठिकाण राहिले नसून देशभरात पसंती वाढली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा यांची अलिबाग येथे भेट झाली होती. अनेक सेलेब्रिटीनि अलिबाग येथे आप आपले फार्महाऊस बांधले आहेत. रोरो बोटीमुळे दोन तास वेळेची बचत व सागरी प्रवासाचा आनंद हा कोकणासाठी ऐतिहासिक पाउल असेल.

रोरो सेवेच कोकण गौरव नाव ठेवल्याचा अभिमान आहे, इतक्या लवकर रोरोची सेवा सुरू होईल असं वाटलं नव्हतं. मुंबई ते अलिबाग बोट सेवा असल्यामुळे मुंबई मधून येणारे पर्यटकाना मुरुड किंवा अलिबाग जवळ वाटतो. रोरो सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईतील पर्यटकांना श्रीवर्धन कडे येण्याचं देखील आकर्षक वाढेल. असे मत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले त्यानंतर श्रीवर्धन नगरपालिका येथील नवीन घंटा गाड्यांचे उद्घाटन देखील पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.