एच.आय.एल रसायनी कंपनी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी येथे केंद्र सरकारचा उपक्रम असणाऱ्या हिल इंडिया लि. कंपनीच्या 2017 पासूनच्या रखडलेल्या स्थगित प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हिल इंडिया लि. च्या रसायनी युनिट मधील शिवसेना प्रणित असणारी एच.आय.एल रसायनी कामगार सेना युनियन च्या पदाधिकाऱ्यांनी मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या माध्यमातून पेट्रोकेमिकल, रसायन मंत्री तसेच आरोग्य व परिवार कल्याण मंत्री मनसुख मांडवीया यांची भेट घेतली.
हिल इंडिया कंपनी दीर्घकाळ टिकून राहावी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती खंडित होऊ नये यासाठी कंपनीला सक्षम आणि सुदृढ बनविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट महत्वाची असल्याने एच.आय.एल रसायनी कामगार सेना युनियनने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या माध्यमातून भेट घेण्याचे ठरविले.
दिल्ली येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन काळात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन बैठक घेणे कठीण असताना सातत्याने पाठपुरावा करत केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांची भेट घेण्यासाठी आठ दिवस संसद भवनच्या परिसरात तळ ठोकून बसलेल्या एच.आय.एल रसायनी कामगार सेनेच्या सोबतीला, बठींडा युनिट मधील एच.आय.इ.यू, दिल्ली हेड ऑफिस, आणि केरळ युनिट मधील युनियन प्रमुख या सर्व युनियन ने मोलाची साथ दिली.

सततचा पाठपुरावा आणि 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पेट्रोकेमिकल, रसायनमंत्री तसेच आरोग्य व परिवार कल्याण मंत्री मनसुख मांडवीया यांची भेट घेऊन बैठक घेण्यात आली. जमलेल्या सर्व युनियन आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान कंपनी विषयी सकारात्मक चर्चा झाल्याने सर्व युनियन पदाधिकारी यांनी समाधान मानत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे आभार मानले.
कंपनी दीर्घकाळ सुरु राहावी तसेच रखडलेल्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी निवेदन देऊन त्यांच्याशी सल्लामसलत करत कंपनी सक्षम आणि सुदृढ होण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे मनसुख मांडवीया यांनी सांगितले.
यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, एच.आय.एल रसायनी कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी, एच.आय.इ.यू (बठींडा) पदाधिकारी, हेड ऑफिस युनियन प्रमुख(दिल्ली), उद्योगमंडळ युनियन प्रमुख (केरळ) आदी उपस्थित होते.








Be First to Comment