श्रमजीवी कामगार संघटनेने मिळवून दिला न्याय : येत्या दहा दिवसांत मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
सिटी बेल | पनवेल |
गेली ७ वर्ष जेडब्ल्युआर या कंपनीत काम असलेल्या कामगारांना अत्यंत अल्प पगारात काम करावे लागत होते. त्याचप्रमाणे त्यांचे अनेक प्रश्न कंपनी प्रशासनाकडून मार्गी लावले जात नव्हते. अखेर या अन्यायग्रस्त कामगारांनी श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडली.
या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने त्यांनी युनियन करण्याची तयारी केली. मात्र याच गोष्टीचा राग मनात ठेवून कंपनीच्या मॅनेजरने कोणतीही नोटीस न देता या १७ कामगारांना कंपनीच्या बाहेर जायला सांगितलं. कामगारांनी कारण विचारले असता कंपनीच्या मालकाने तुम्हाला बाहेर काढायला सांगितलं आहे असं मोघम उत्तर देऊन कामगारांना बाहेर काढले.

त्यानंतर या अन्यायग्रस्त कामगारांनी मनसेची सचिन गोले यांची युनियन केली होती. परंतु या कामगार नेत्यांनी देखील आपली फसवणूक केल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली. त्यानंतर या कामगारांनी आपली कैफियत श्रमजीवी कामगार संघटनेचे सर्वेसर्वा विवेक पंडित यांच्याकडे मांडली. श्रमजीवी कामगार संघटनेकडे धाव घेतल्यानंतर त्यांचा पाठिंबा व या विभागातील समाज सेवक यांना सोबत घेऊन अन्यायग्रस्त कामगारांनी न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन केले.
कामगारांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून जेडब्ल्यूआर प्रशासनाने येत्या दहा दिवसात कामगारांचे सर्व प्रश्न निकाली काढून त्यांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे जाहीर केले आहे.
या आंदोलनात श्रमजीवी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यां योगिता ताई, अजित म्हात्रे, राकेश गायकवाड़, अमर म्हात्रे आदींसह कामगार सहभागी झाले होते.








Be First to Comment