ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात वारकरी तल्लीन
सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |
रायगड जिल्यात रोहयातुन पायी वारिसाठी निघालेल्या वैष्णवांचा मेळा नुकताच आळंदीकडे प्रस्थान झाला असताना हेदवली, जांभुळपाड़ा,येथून थेट पुणे जिल्ह्यात लोणावला(कुरवंडे) येथे ही दिंडी आली असता जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या दिंडीत हरिनामाच्या गजरात वारकरी,महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन तल्लीन झाले.या दिंडीत भक्तिरसात न्हान्याचा आनंद सार्याणि घेतला.ज्ञानबा तुकाराम असा जय घोष मात्र साऱ्यांच्या मुखात असल्याने किती चालतोय याचे भान मात्र वारकरी विसरले असल्याचे पहावयास मिळाले.
रायगड भूषण ह.भ.प. पुरुषोत्तम पाटिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा ते आळंदी कडे निघालेल्या दिंडीचे जागो जागी स्वागत होत असताना कुरवंडे येथेही गावातील महिलांनी दिंडीचे औक्षण केले.याठिकाणि मैदानात दींडीतील वारकरी व् महिलानी गोल रिंगण धरित मोठ्या जल्लोश्चात हरीनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचन्याचा आनंद घेतला.येथील हभप सुभाष महाराज पडवळ यांच्या निवासस्थानि या दिंडीतील वारकरी वर्गाची चहा,नास्ता, भोजन व्यवस्था उत्तम पद्धतीने केलि होती.याठिकानि पुरुषोत्तम पाटिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ व कीर्तन करण्यात आले.
दरवर्षी कुरवंडे येथे येत असलेल्या दिंडीच्या हरिपाठ पाहन्याकरीता या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलि होती.या दिंडीची मनोभावे सेवा करण्याची संधि मिळाल्याचा पडवळ कुटुंबियाच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला. यानंतर आज पुढे ब्राह्मणवाडी कडे आज सकाळी प्रस्थान केले असून याच ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे रायगड भूषण पुरस्कार प्राप्त ह.भ. प.श्री पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी सांगितले.
Be First to Comment