सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या एकता कॅटलिस्ट या संघटनेच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त उरणमध्ये कामगार प्रकल्पग्रस्त आणि ओबीसी समाजाचे भव्य मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता उरण मधील जेएनपीटी टाउनशिप च्या मल्टीपर्पज हॉल मध्ये बहुसंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना नवरत्न कॅटलीस्ट पुरस्काराचे वितरण व ओबीसी/ व्ही जे एन टि जनमोर्चा संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती म्हात्रे यांची निवड झाल्याने त्यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.कामगार कायदे आणि चळवळीबाबत तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामगार वर्गांनी,प्रकल्पग्रस्त, शेतकर्यांनी,मच्छीमारांनी या कामगार मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन एकता कॅटलीस्ट या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.








Be First to Comment