Press "Enter" to skip to content

ग्यानबा तुकोबांच्या गजरात संभे कोलाड येथून पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

देव धर्म समाज मानवता यांची नीती मूल्यांची जोपासना जाणारे म्हणजे भारतीय संस्कृतीतिल वारकरी संप्रादय ,मार्ग दाऊनीया गेले आधी l दयानिधी संत ते ll तेणेचि पंथे चालो जाता l न पडे गुंथा कोठे काही ll कोकणचे श्रद्धास्थान स्वा सुख निवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज यांच्या प्रेरणेने गुरुवर्य गोपालबाबा वाजे यांच्या कृपा आशीर्वादाने रायगड भूषण ह.भ.प. नारायण तात्या (आण्णा) दहिंबेकर, आणि नारायण बाजी महाबळे यांच्या संकल्पनाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज सत्संग वारकरी सेवा मंडळ संभे कोलाड यांच्या कार्य प्रणालीने सुरु असलेला दिंडी सोहळा सन 2000 सालापासून अविरत पायी दिंडी सोहळा ह्या सोहळ्याच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील अनेक भाविक मंडळी व वारकरी एकत्रित येऊन चांगल्या विचारांची देवाण घेवाण करून एक आनंद निर्माण देतो, समाज्यात वावरण्यासाठी उपयोगी असे आपल्याला देह धर्माशी निगडित राहून (तस्मोमा जोतिदेर्ग्मये) अखंड नामस्मरणाच्या व कीर्तन प्रवचन प्रबोधनाच्या मध्यानातून संत ज्ञानोबा तुकोबांच्या जय घोषात टाल मृदुन्ग च्या गजरात ही गुरुवर्य सद्गुरू अलिबागकर महाराजांचा पालखी रथ पायी दिंडी संभे ते आळंदीकडे प्रस्थान झाले.

आळंदीकडे प्रस्थान झालेली दरम्यान हि पायी दिंडी सोहळा थेट संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा संपन्न करीत या दिंडीची सांगता होणार आहे अत्यन्त खडतर प्रवासातून तसेच ताम्हिनी घाटातून पायी चालत जाणारी हि दिंडी भैरवनाथ मंदिर संभे कोलाड येथून कलश पूजन पाद्य पूजन गुरवर्य स्वा सुख निवासी अलीबागकर महाराज गुरुवर्य गोपाल बाबा वाजे यांचे प्रतिमा पूजन टाळ मृदूगांच्या व हरिनामाच्या गजरात या पायी दिंडीचे प्रस्तावना होणार असून सुतारवाडी विळे , निवे जामगाव, बापूजी मंदिर घोटवडे,पुनावले , पुनवले ते देहू आळंदी 2 डिसें रोजी आळंदी आलंकापुरित ज्ञानोबा माऊलींच्या समाधिस प्रदीक्षणा अर्पण करून भोईराज धर्म शाळेत या निवासस्थानी हि दिंडी भक्तिमय वातावरणात स्थान मांडणार आहे.

या दिंडी सोहळ्यात गुरुवर्य रायगड भूषण ह.भ. प. ना. ता. दहिंबेकर, रुपेश शेळके, पंचपदी, गणेश नलावडे,नथुराम उतेकर, रायगड भूषण पुरुषोत्तम महाराज पाटील , ओंबले, जुईकर, गणेश दिघे असे अनेक महंत व विविध महात्म्यांचे हरिपाठ प्रवचन कीर्तन भजन काकडा आरती अशा भक्तिमय वातावरणात सेवा या दिंडी सोहळ्यात होणार आहेत.

गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुले शासनाच्या नियम अटी शर्तीमुळे धार्मिक कार्यक्रम व देव दर्शनांची मंदिरे बंद करण्यात आली होती परंतु कोरोना संकटावर मात करण्यात भारत देश अव्वल स्थानी ठरले आहे त्यामुळे मागील आषाढी वारीला प्रमुख पालख्यांना व त्यांचे प्रमुख चालक यांना परवानगी दिली गेली होती त्यामुळे अनेक वारकरी भक्तगण दिंडी सोहळा अथवा वारी पासून वंचिन राहिले परंतु कार्तिकी वारी साठी पंढरपूर आळंदी या वारीकरिता शासकीय परवानगी असल्याने अनेक वारकरी संप्रदाय व भक्तगण यांच्या आशा प्रल्लवित झाल्या आणि बहुतांश वारकरी मंडळींची वारी सुखकर झाली या पाठोपाठ असंख्ये वारकरी भाविकांची चाहूल आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याला आळंदी अलंकारपुरी कडे वळली असल्याचे चित्र पायी दिंडीच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.