सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | प्रतिनिधी |
संत परंपरेची वहीवाट म्हणजेच पायी दिंडी सोहळा या संतांच्या राज मार्गाने जर जीवनाची वाटचाल केली तर एक आगळा वेगळा आनंद उपभोगायला मिळतो. यात्री अलंका पुरा येती, ते आवडती विठ्ठला , पांडुरंग प्रसन्न पणे, दिधले देणे या ज्ञाना, राम म्हणे वाटचाली यज्ञ् पाऊला पाऊली !!
गुरुवर्य ह. भ. प पांडुरंग महाराज म्हात्रे ( धाऊळपाडा ) गुरुवर्य ह. भ. प तुकाराम महाराज बुर्डीकर यांच्या आशिर्वादाने तसेच वैकुंठवासी ह. भ. प पांडुरंग महाराज भोईर यांच्या प्रेरनेणे ज्ञानेश्वर मंदिर तरशेत ते देवाची आळंदी पायी दिंडी वारी सोहळा बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान केले.
दिंडी संचालक ह. भ. प. रघुनाथ महाराज भोईर, ह. भ. प. नामदेव महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे आयोजन तरशेत पंचक्रोशीतील भाविक भक्तगन यांनी केले आहे. या दिंडीत सहभागी असणाऱ्या भाविक भक्तांना चहा नास्ता व भोजनाची वेवस्था सुरवाती पासून शेवट पर्यंत दानसुर वेक्तिमत्व असणारे सेवा रूपाने मदत करतात.
या पायी दिंडीत तरशेत, जांभूळटेप, मुंढानी, शिहू, झोतीरपाडा, धुलवड, चोले, शेतजुई, कडसुरे, बेणसे, बेनसेवाडी, गांधे, बेणसेकातकरवाडी, पंचक्रोशी आमटेम, निगडे आदी परिसरातील वारकरी तसेच भाविक भक्तांचा सहभाग असणार असल्याचे मत दिंडी चालक ह. भ. प. रघुनाथ महाराज भोईर यांनी सांगितले.
दिंडी मध्ये मोलाचे योगदान ह. भ. प. चिंतामण महाराज घासे, मंगेश महाराज भोईर, सुनील पाटील, एकनाथ कुथे, पंडित म्हात्रे, द्वारकानाथ गदमले, किशोर कुथे विभागातील सर्व भाविक भक्त व वारकरी सांप्रदाय यांचा लाभणार आहे.
Be First to Comment