सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील कोतवाल बुद्रुक गावाचे सुपुत्र आणि राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांच्यापासून सदैव प्रेरणा घेत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आदर्शवत वाटचाल करणारे माध्यमिक शिक्षक विजय गोपाळराव दरेकर यांना यंदाचा कोकण विभाग वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2021 प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री ना.कपिल पाटील व विधानपरिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर, माधवीताई नाईक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माध्यमिक शिक्षक विजय दरेकर यांनी पुरस्कार स्विकारला. पोलादपूर तालुक्यातील उमरठ, साखर, लोहारे आणि कोतवाल येथील माध्यमिक प्रशाला असलेल्या नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माऊली प्रशाला कोतवाल येथे माध्यमिक शिक्षक असलेल्या विजय दरेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे पोलादपूर तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.








Be First to Comment