एस .एच .केळकर कंपनी आणि प्रायमा यांच्यामाध्यमातून १२५ विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
कोरोनांच्या पाश्व भुमी वर अनेकांचा रोजगार गेल्यामुळे हाताला काम नाही त्यामुळे पैश्यांची चंचळता निर्माण होत असतांना आपल्या मुलांना शाळेय शिक्षक कसे देणार ? हाच विचार पालकांच्या मनामध्ये सातत्याने घर करून राहिले होते.जेथे एक वेळच्या जेवणांची भ्रांत,वाढती महाघाई, मात्र विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी बाळ दिनांचे औचित्य साधून एस.एच.केळकर कंपनी व प्रायमा यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब,गरजू स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील आज ही डोंगर द-या खो-यात राहणारे आदिवासी बांधव आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत. मात्र कोरोना मुळे सर्वच शाळा ऑनलाईन झाल्यामुळे घरची परस्थिती बिकट असल्यामुळे पालक आपल्या मुलांना मोबाईल देवू शकत नाही.यामुळे ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेले खालापूर तालुक्यातील जांभिवली वाडी,खुटलवाडी आणि करांडे बुद्रुक या गावातील, वाडीतील १२५ विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमास केळकर कंपनी चे व्यवस्थापक शिर्के सर, संजय ठाकूर हे उपस्थित होते.त्याच समवेत रसायनी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहित पाटील, डॉ .मनोज कुचेरीया,डॉ.धीरज जैन , डॉ .राहुल यादव,डॉ अनिल पाठक , डॉ .प्रतीक लोहार डॉ.युवराज म्हशेळकर हे उपस्थित होते.
जिल्हापरिषद शाळा वावेघर केंद्रप्रमुख – बबन म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या स्वाध्याय पुस्तकांचे वाटप केल्यामुळे कंपनी आणि प्रायमा चे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायकर गुरुजी, देशमुख सरानी केले. यावेळी विद्यार्थांना मिळालेल्या स्वाध्याय पुस्तकामुळे शिक्षण सहज घेता येणार असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे भाव दिसत असतांना पवावया मिळाले.








Be First to Comment