प्रा.आमलपुरे सूर्यकांत “अवगत सन्मान २०२१” या पुरस्काराने सन्मानित
सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |
येथील डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी काँलेज मधील हिंदी विषयाचे प्राध्यापक, हिंदी विभाग प्रमुख श्री. आमलपुरे सूर्यकांत यांना अक्षरवार्ता आंतरराष्ट्रीय शोधपत्रिका व कृष्ण बसंती शैक्षणिक व सामाजिक जनकल्याण समिती उजैन, मध्य प्रदेश येथून २०२१ या वर्षीचा “अवगत सन्मान पुरस्कार” देण्यात आला असून हा पुरस्कार त्यांनी केलेल्या शोधकार्यासाठी दिलेला आहे. गेली १२ वर्षांपासुन शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ४० शोध निबंध प्रकाशित झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ४० चर्चासत्रात सहभागी झाले असून ३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
त्यांच्या या यशाबाबत संस्थेचे सचिव संदीप तटकरे, सर्व पदाधिकारी, प्राचार्य शंकर मुंडे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment