Press "Enter" to skip to content

शाळेच्या इमारतीचे भूमीपूजन

खोपटे शाळेच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपटेच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी तयार व्हावेत. ते प्रत्येक क्षेत्रात चमकावेत यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज असून रायगड जिल्हा परिषदेच्या खोपटे येथील नवीन इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यासाठी मराठी माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमातूनही येथे शिक्षण सुरु करावे. जेणेकरून काळाच्या बरोबर विद्यार्थ्यांना शिकता येईल. काळाच्या बरोबर राहता येईल. असे प्रतिपादन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उरण येथे केले.

उरण मधील डीपी वर्ल्ड या कपंनीच्या माध्यमातून खोपटे येथे रायगड जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधण्यात येत असून या शाळेच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, डी पी वर्ल्डचे डायरेक्टर जिबू के इट्टी, फ्री ट्रेड झोनचे सीईओ -रंजित रे, पंचायत समितीचे सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, पंचायत समिती बीडीओ नीलम गाडे, ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडाचे सरपंच विशाखा ठाकूर, उरण नगर परिषदेचे नगराध्यक्ष सायली म्हात्रे, गट शिक्षणाअधिकारी के. बी. अंजने, ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, पाणी कमिटी खोपटेचे सभापती महेंद्र पाटील, खोपटे शाळेचे सभापती रंजना पाटील, हायस्कूल खोपटेचे चेअरमन राजन पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजू ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नवीन इमारत कामा संदर्भात पंचायत समिती उरण,ग्रूप ग्राम पंचायत बांधपाडा,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ मंडळ खोपटा यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे आपल्या प्रास्तविकात खोपटेचे ग्रामस्थ तथा भाजपचे युवा नेते प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे आभारही मानले.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आपल्या भाषणात त्यांनी सर्व राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार महेश बालदी यांनी डीपी वर्ल्ड या कंपनीच्या माध्यमातून अंदाजे 5 कोटी 10 लाखाचे अद्ययावत व सर्व सुविधानी युक्त असे खोपटेची शाळा बांधण्यात येणार असून या कामासाठी सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर व खोपटे येथील युवा नेते प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले. आज प्रत्यक्षात कामाची सुरवात करण्यात आले आहे. खोपटे गावातील ग्रामस्थांना अद्ययावत सुविधा या नवीन इमारतीच्या माध्यमातून माध्यमातून मिळणार असून येथे इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण द्यावे जेणेकरून शिक्षणाचा दर्जा सुधारेल व सर्वांना मराठी भाषे सोबत इंग्रजी या आंतर राष्ट्रीय भाषेचेही ज्ञान मिळेल. यामुळे सर्वांना काळाच्या बरोबर पुढे जाता येईल. जे काही मदत लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपापले मते व्यक्त केली. यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कर्मचारी वर्ग, ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळ खोपटेचे सर्व सदस्य, हायस्कुल कमिटीचे सदस्य, खोपटेचे ग्रामस्थ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.