विद्यामंदिर पोलादपूरच्या नवतरूणींसोबत डीवायएसपी निलेश तांबे यांचा सुसंवाद
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
समाजातील नातेवाईक, मित्रपरिवार तसेच आप्तशेजारी यांच्यापासून महिलावर्गाला विविध प्रकारच्या अत्याचारांना सहजपणे सामोरे जावे लागत असताना पुढील अतिप्रसंगाला सामोरे जावे लागू नये, यासाठी वेळीच सावधपणे प्रतिकार करण्याची समयसूचकता दाखविण्याची आवश्यकता असल्याचे मत महाड उपविभागीय पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी व्यक्त केले.
पोलादपूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर पोलादपूर येथे नवतरूणी विद्यार्थिनींसोबत डीवायएसपी निलेश तांबे यांनी संवाद साधला. यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव पोलादपूर उपस्थित होते.
यावेळी डीवायएसपी तांबे यांनी विद्यार्थिनींना महिला सक्षमीकरण महिलांविषयक अत्याचार, गुड टच व बॅड टच तसेच सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन केले. पोलीस विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या पोलीस काका तसेच पोलीस दिदी या संकल्पनेची माहिती दिली. यावेळी पोलीस नाईक इक्बाल शेख, महिला पोलीस नाईक शिरगावकर तसेच कार्यक्रमाकरिता 100 विद्यार्थिनी हजर होत्या.








Be First to Comment