Press "Enter" to skip to content

एस टी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

राजीनामा देऊन एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, एका कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत एस टी कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यामध्ये विविध कामगार संघटनांचे बहुतांश एस टी कामगार यामध्ये सहभागी झाले होते. मात्र आता उपोषण स्थगित करून संयुक्त कृती समिती बरखास्त केली आणि संघटनांच्या पदाचे राजीनामे देऊन प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केल्याने कर्जत आगारातून आज फक्त चार एस टी बस सुटल्या. त्यामुळे प्रवाशांची दुसऱ्या दिवशीही चांगलीच गैरसोय झाली. एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु अन्य कामगारांनी वेळीच त्याला आडवल्याने पुढील अनर्थ टळला.

एस टी कामगारांची वेतन वाढ, महागाई भत्ता, घरभाडे वाढ तसेच राज्य शासनात विलीनीकरण करावे आदी मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.

एसटी स्थानकात शुकशुकाट

कर्जत एस टी कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र त्यांच्या काही मागण्या पूर्ण झाल्या परंतु राज्य शासनात विलीनीकरण करण्याची प्रमुख मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे विविध संघटनांकडे पाठवून बेमुदत संपाचे हत्यार उचलले.

याप्रसंगी पंढरीनाथ काकडे या चालक कर्मचाऱ्याने शेजारीच असलेल्या झाडाला फास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु तेथे उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला आडवल्याने पुढील अनर्थ टळला. आज कर्जत आगारातून चार एस टी बस रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सोडण्यात आल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.