Press "Enter" to skip to content

तरूणाला मिळाले जीवदान

छातीमध्ये जन्मजात दोष असलेल्या २९ वर्षीय तरुणाच्या दुर्मिळ आजारावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

भारतामध्ये अनेकवेळा जन्मजात असलेले दोष दुर्लक्षित केल्यामुळे प्रौढावस्थेत त्याचा त्रास होऊन गंभीर आजार होण्याच्या घटना अनेकवेळा समोर आल्या आहेत. हे आजार समोर आल्यावरसुद्धा अनेकवेळा त्यावर योग्य ते उपचार केले जात नाही व डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे पेशंटला बरे वाटत नाही अशा तक्रारी आपल्याला पहावयास मिळतात. अशा केसेसमध्ये त्या रोगाचे योग्य निदान होणे गरजेचे असते. कल्याणमधील २९ वर्षीय रामसिंगला एक जन्मजात अत्यंत दुर्मिळ असा आजार आढळून आला होता व त्यावर घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये योग्य निदान झाल्यामुळे त्यावर योग्य उपचार करणे शक्य झाले.

झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बॅरिएट्रिक सल्लागार आणि जीआय सर्जन डॉ. जयदीप पालेप व लॅप्रोस्कॉपिक व जीआय सर्जन डॉ. निधी खंडेलवाल यांनी रामसिंगवर यशस्वी उपचार केले. जन्मजात असलेला हा आजार वयाच्या २९ व्या वर्षी निदान होऊनही रामसिंगची तब्येत आता उत्तम आहे.

रामसिंगला असलेला हा आजार व त्यावरील उपचाराविषयी बोलताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बॅरिएट्रिक सल्लागार आणि जीआय सर्जन डॉ. जयदीप पालेप सांगतात, रामसिंगला असलेल्या या आजाराचे नाव इवेन्ट्रेशन ऑफ डायफ्राम असे असून हे एक दुर्मिळ वैद्यकीय स्थिती आहे.डायफ्राम म्हणजे छातीच्या पोकळी आणि उदरपोकळी दरम्यान स्नायूंचा सेप्टम आहे.जो श्वासोच्छवासाचा मुख्य स्नायू आहे आणि उदर आणि छातीची पोकळी वेगळे करतो. परंतु या केसमध्ये डायफ्रामला भेदून पोट आणि कोलन सारख्या पोटातील सामग्री छातीमध्ये सरकली होती त्यामुळे रामसिंगला उलट्या होणे, धाप लागणे अशी लक्षणे वांरवार दिसत होती.

हा आजार जन्मजात असून जर त्यावेळी उपचार केले असते तर त्याला कोणताही त्रास झाला नसता परंतु हा आजार वयाच्या २९ व्या वर्षापर्यंत दुर्लक्षित राहिला व या आजारावर जर उपचार झाले नाही तर फुफ्फुसाचे कायमचे नुकसान होऊ शकते. यामध्ये आम्ही सिटी स्कॅन व इतर वैद्यकीय चाचण्या करून त्याचे योग्य निदान झाले व त्यावर आम्ही लॅप्रोस्कॉपीक शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविले.

झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या लॅप्रोस्कॉपीक व जीआय सर्जन डॉ.निधी खंडेलवाल सांगतात, या केसमध्ये शस्त्रक्रिया करून सुधारणा आवश्यक होते ज्यामध्ये डायाफ्रामवर टाके घालून त्याच्या सामान्य जागी आणले जाते. पारंपारिक वैद्यकीय क्षेत्रात ही शस्त्रक्रिया छाती आणि पोटावर मोठ्या चीरांसह केली जाते आणि रुग्ण बरे होण्यास एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. परंतु झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाच्या मदतीने, आम्ही या केसवर मिनिमली इनव्हेसिव्ह शस्त्रक्रिया, म्हणजे कीहोल लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.

ओटीपोटावर फक्त ४ लहान कट होते आणि शस्त्रक्रियेनंतर रामसिंगच्या श्वासोच्छवासात त्वरित सुधारणा झाली शस्त्रक्रियेनंतर केलेल्या छातीच्या एक्स-रेमध्ये डायाफ्राम सामान्य स्थितीत दिसून आला. शस्त्रक्रियेनंतर रामसिंगला ४८ तासांत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.”

घाटकोपरमधील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल हे मुंबई पूर्व उपनगर आणि ठाणे शहर व जिल्ह्यातील रहिवाशांसाठी एक मोठा दिलासा आहे कारण रेल्वे, मेट्रो आणि महामार्गावरून झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल मध्ये पोहोचण्यास विलंब लागत नाही. झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये विविध आजारांसाठी सर्वसमावेशक निदान आणि उपचार सुविधा देतात, अशी माहिती झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बिझनेस हेड आशिष शर्मा यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.