Press "Enter" to skip to content

ग्रंथालयाला संविधानाची भेट

शेडुंग सेंट विल्फ़्रेंड लॉ कॉलेज विद्यार्थी समूहाकडून ग्रंथालयाला संविधानाची भेट

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

शेडुंग येथे असणाऱ्या सेंट विल्फ़्रेंड लॉ कॉलेजमध्ये नुकताच दीक्षांत समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन डॉ.केशव बढाया यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी ,आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते .

लॉ कॉलेजमधील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम अध्यापन स्वयंम प्रक्रिया म्हणून गुगल मिट रात्रशाला उपक्रम सुरू केला आहे .याकामी विद्यार्थी निलेश म्हात्रे ,संजय गायकवाड,अमोलराजे पाटील,संदीप नानेकर,मनोहर देशमुख,अरविंद शिलीमकर, योगेश भोसले, शरद निकुंभ,संजय सदाले, संदेश घरत,आकाश सोनवणे,हरेश्वर मुंडे, स्वप्नील साळुंखे,नरेश म्हात्रे,संजीव बी एम,प्रफुल्ल गुडेकर,हर्षद पाटील,विलास बागुल ,श्रीकृष्ण आपटे,जयराम गायकवाड, विशाल थोरात,सागर नावडे,विलास तारे, रवींद्र लंकेश्वर,नानासाहेब वाघमोडे,आकाश आडोळे, रुता सारगे,मानसी पाटील,पूनम वाघमोडे,स्मिता कुथे,राजेश्री महाजन,हर्षदा जांभूळकर,पूर्वी कोशे,रुपाली हरांशिखरे, योगिता म्हात्रे,रुक्मिणी धायगुडे,अस्मिता शिंदे,सुप्रिया कोळेकर,हर्षदा मुंडे,मनीषा डायरे,प्रणिता निगुडसे ,दर्शना धारवाड आदींसह अन्य विद्यार्थी यांचा सहभाग असतो .

याच समूहाच्या प्रमुखांकडून लॉ कॉलेज ग्रंथालयाला संविधानाच्या पुस्तकाची भेट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते प्राचार्य डॉ मृत्युंजय पांडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.