Press "Enter" to skip to content

कळंबोलीत शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीत शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल | कळंबोली |

शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने कळंबोली येथील आनंद मंगल सोसायटी सेक्टर-१० येथील शेकडो पुरुषांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

या वेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपतालुका संघटक आबासो लकडे, शहर समन्वयक गिरीष धुमाळ, शहर प्रमुख डी.एन. मिश्रा, शहर संघटक अक्षय साळुंखे, अरविंद कडव उपशहर प्रमुख नारायण फडतरे, विभाग प्रमुख महेश गुरव, आकाश शेलार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.