Press "Enter" to skip to content

गणपती आरास स्पर्धा

रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन गणपती आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण

सुप्त गुणांना वाव देणारी आरास स्पर्धा कौतुकास्पद : आ. भरतशेठ गोगावले

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

गणेशोत्सवात कोरोनाचे संकट असताना देखील अनेकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन ने आयोजित केलेली गणेशोत्सव आरास ही स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरोद्गार महाड-पोलादपूरचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन आयोजित गणपती आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात काढले.

रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन कडून गणेशोत्सव काळात घरगुती गणपती आरास स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा बक्षीस वितरण सोहळा महाड येथील हाॅटेल समृध्दीच्या सभागृहात शनिवार दिनांक २३ आॅक्टोबर रोजी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी आमदार भरतशेठ गोगावले उपस्थितांना संबोधताना बोलत होते.

या कार्यक्राला महाड मधील प्रसिद्ध वेदिका बिल्डर्सचे मालक व सामाजिक कार्यकर्ते राजेश मेहतर, रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशन या संघटनेचे संस्थापक शामकांत नेरपगार, जिल्हा अध्यक्ष संतोष घरटकरक, उपाध्यक्ष श्रीकांत शेलार तसेच खजिनदार अॅड महेश पवार, सौ. अंजली घरटकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ. भरतशेठ गोगावले पुढे म्हणाले की, पत्रकार संघटनेचे संघटन उत्तम असल्याचे सांगत त्याचे सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. बक्षिसपात्र स्पर्धकांचे देखील आमदारांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. ते पुढे बोलताना म्हणाले की, कोरोनाचे संकट अजूनही टळलेला नाही मी देखील अजूनही दोन-दोन मास्क लावतो. काही देशांत पून्हा नव्याने कोरोना रुग्ण वाढल्याचे सांगत प्रत्येकाने मास्क वापरावे असे आवर्जून सांगितले तसेच अनेकजण मास्क लावत नाही त्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली. पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व महाड येथील जेष्ठ पत्रकार संतोषजी घरटकर यांनी अत्यंत कमी वेळेत देखना कार्यक्रम ठेवल्याबद्दल आमदार गोगावले यांनी व्यक्तिशः त्यांचे कौतुक केले.

या गणेशोत्सव आरास स्पर्धेत प्रथम क्रमांक अंकित विनायक जाधव यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक विनायक आप्पा महाडिक तर तृतीय क्रमांक गिरिष मोकल व सुनील गांधी यांना विभागून देण्यात आला. तसेच सुनील पाडावे व बबन लोखंडे यांना उत्तेजणार्थ पारितोषिक देण्यात आले.

या कार्यक्रमात महाड येथील नामांकित सुनील गांधी क्लासेस च्या संचालिका गांधी मॅडम, महाड येथील शिक्षिका तसेच सृष्टी ट्रॅव्हल च्या संचालिका स्मिता जोष्टे मॅडम तसेच कोंकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हा समन्वयक व निवृत्त मुख्याध्यापक अ. वि. जंगम सर, राजेश मेहतर, अॅड. महेश पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. दरवर्षी संघटनेकडून ३१ डिसेंबर रोजी पत्रकार संघटनेकडून समाजातक पाच महिलांना ‘आदर्श माता’ हा पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात येते असल्याची माहिती यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालक भास्कर ठाकूर यांनी दिली. याच कार्यक्रमात गणपती आरास स्पर्धेचे परिक्षक व महाड मधील प्रसिद्ध चित्र कलाकार कु. यश संतोष घरटकर याचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.