चिल्हे चे ग्राम दैवत धाक्सुद महाराजांचा नवरात्रोत्सव, पालखी सोहळाचा लुटला आनंद
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे ग्रामस्थांचे आराध्य ग्रामदैवत धाक्सुद महाराजांचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साह वातावरणात व आनंदात साजरा करण्यात आला ,यावेळ शासनाच्या नियम अटीशर्थीनुसार येथील ग्रामस्थांनी केला साजरा तर पालखी सोहळाचा भरभरून सर्वांनी लुटला आनंद ग्राम दैवतांचे दर्शन देत येथील ग्रामस्थांनी अति दक्षतेने केला साजरा.
यावेळी येथील ग्रामस्थ व महिला युवक युवती यानिवअतिशय परिश्रम घेऊन मंदिरा सभोतील व गावातील प्लास्टिकमुक्त प्रतिज्ञा घेत स्वच्छता केली येथे नवरात्र उत्सवात मंदिरातील ग्रामदेवतासह मूर्तींना वस्त्र व मुखवटे दाग दागिने घालून सजविण्यात आले तसेच दररोज येथील ग्रामस्थांनी दरवोज शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत ग्रामदैवताची पूजा आरती व धार्मिक कार्यक्रम मंदिरात सकाळी काकडाआरती सायंकाळी हरिपाठ भजन तसेच दसरा निमित्ताने देवाची आळंदी येथील ह.भ.प.पंडित महाराज नागोरगोजे यांची कीर्तन रुपी सेवेचा लाभ घेत मागील एक दोन दिवस लहान मुलांनी विविध वेष भूषा परिधान करत दांडिया खेळत करण्यात आले.
या नवरात्रोत्सव काळातील सालाबादप्रमाणे यावर्षी ग्राम दैवत श्री धाक्सुद महाराजांचा पालखी सोहळा शांततेत व मोठ्या उत्साह भक्तमय वातावरणात पालखी सोहळा साजरा केला .
प्रशासकीय यंत्रणेबरोबरच कोलाड विभागीय पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी ग्रामस्थ नागरिकांना दिलेल्या सूचनांचे पालन करत हा नवरात्रोत्सव व पालखी सोहळा आनंदाने साजरा केला .गावचे पोलीस पाटील गणेश महाडिक,गाव कमिटीचे अध्यक्ष सुधीर लोखंडे ,उपाध्यक्ष रमेश महाडिक,सेक्रेटरी तुकाराम महाडिक, खजिनदार अनंत लोखंडे, सुरेश महाडिक,गजानन जंगम, उपसरपंच सौ मानसी लोखंडे,सदस्या सौ रिया लोखंडे, सदस्य व माजी सरपंच शांताराम महाडिक,हभप नारायण लोखंडे,महादेव महाडिक,सहदेव महाडिक,ज्ञानेश्वर लोखंडे, तुकाराम महाडिक,राम भाऊ लोखंडे, धनाजी महाडिक,सुनील महाडिक,प्रवीण घायले, गणपत शिंदे,धनाजी लोखंडे,प्रमोद शिंदे,मंगेश लोखंडे,तसेच देवाचे पुजारी काशिराम घायले व मारुती शिंदे,यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रणाखाली हा उत्सव संपन्न झाला तर नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता शेवटी महाप्रसाद भोजनांनी करण्यात आली असून यशस्वीतेसाठी श्री धाक्सुद मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ महिला मंडळांनी अथक परिश्रम घेतले.
Be First to Comment