रामकी कंपनीच्या माध्यमातून तळोजा मजकूर दशक्रिया विधी घाटावर थंड पाण्याची सोय
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील तळोजे मजकुर येथिल आदीवासी पाडा व तळोजे मजकूर येथिल शंकर मंदिराजवळ असणार्या दशक्रिया घाटाजवळ रामकी कंपनीच्या माध्यमातुन थंड पाण्याचे आर. ओ. प्लांट उभारण्यात आले.
अंत्यविधी घाटाजवळ बसवलेल्या आर. ओ. प्लांटमुळे येथे दशक्रिया विधीसाठी येणार्या नागरिकांसाठी मोफत स्वच्छ थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. याचे उद्घाटन शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,नगरसेवक हरेश केणी, ए. व्ही. रामीरेड्डीं, सोमनाथ मालगर, हरेश धिवर तसेच खोब्राजी पाटिल आदी उपस्थित होते.








Be First to Comment