Press "Enter" to skip to content

शिरीष घरत यांचा दानशुरपणा : बंद पडलेला व्यवसाय दिला सुरू करून

सिटी बेल | खारघर |

आज शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांनी खारघर शहरातील ज्ञानेश्वर सोनवणे यांचा बंद पडलेला व्यवसाय (रोजगार) आर्थिक सहाय्य करून परत सुरू करून दिला.

खारघर शहरातील ज्ञानेश्वर सोनवणे दोन्ही पायाने अपंग आहेत. ते आपला अपंग स्टॉल चालवून उदर निर्वाह करत होते. परंतु मागील कोरोना काळात त्यांचा व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांचा अपंग स्टॉल मोडकळीस आला होता. त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन, आपली व्यथा मांडली.

सध्याची परिस्थिती पाहता, विलंब न लावता जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी त्यांचा मोडकळीस आलेला अपंग स्टॉल दुरूस्ती करण्यासाठी आर्थिक सहाय्य करून, त्यांचा बंद पडलेला व्यवसाय (रोजगार) पुनः सुरू करून दिला व शुभेच्छा दिल्या.

यावेळी महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील, उपशहर प्रमुख प्रकाश गायकवाड, माजी उपशहर प्रमुख रवी धाडवे,शिवसेना उत्तर भारतीय शहर अध्यक्ष शैलेन्द्र त्रिपाठी, जेष्ठ शिवसैनिक गिरिष गुप्ता व जगन्नाथ सोनार आदि पदाधिकारी उपस्थित होते…!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.