पनवेल उरण तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळणार
– आमदार बाळाराम पाटील
केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी व कामगारांच्या नवीन कायद्याला दिल्ली येथे विरोध करीत असलेल्या विविध शेतकरी संघटना व कामगार संघटना यांच्यावर केंद्रातील भाजप सरकार कोणतीही बोलणी न करीता त्यांच्यावर अमानुष आत्याचार करीत आहेतच आशात आता विविध राज्यामधून देखील शेतकरी व कामगार वर्ग संघटीत होवून आपल्या राज्यात शांतता प्रिय अशी आंदोलने केंद्र सरकार विरोधात करीत आहेत.
त्याचाच भाग म्हणून मागील आठवडयात उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील शेतकरी बंधू भगिनी शांततेने दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी मोर्चा काढला होता. सदर मोर्चावर भाजपाचे केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा हयांने बेदकारपणे शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून ११ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. अशा प्रकारे नरसंहार करून भाजप सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज कायमचा बंद करण्याचे कृत्य करत आहेत. हे सगळे होवून आठवडा झाला तरी अजून ही सदर प्रकरणातील कोणत्याही मारेकऱ्याला युपीच्या भाजप सरकार कडून साधी अटक ही झाली नाही. या कृतीवर उच्च न्यायालयाने देखील युपी मधील भाजप सरकारवर ताषेरे ओढले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकाराबाबत भाजप युपी सरकारकडून खुलासा मागविला आहे.
भारत हा लोकशाही व संविधानावर चालणारा देश आहे. आणि अशा या भारतात वरील प्रकारामुळे आभिव्यक्ती स्वातंत्र्यावरतीच घाला घालण्याचे काम भाजपा चे केंद्र सरकार करीत आहे. म्हणूनच महाराष्ट्रात सदर शेतकऱ्यांवर होत असलेल्या सततच्या अन्याया विरोधात आणि लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्याच्या केलेल्या नरसंहारा विरोधात निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यामातून येत्या ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलच्या शेकाप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन बंद चे बाबत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस चे पनवेल जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे,काँग्रेस चे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, युवक काँग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे,माजी नगरसेवक अच्युत मनोरे आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment