Press "Enter" to skip to content

अधुरम मधुरम चॅनल चे रविशेठ पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

वैभव सोनटक्के यांची म्युझिक थेरपी साठी डेडिकेटेड वहिनी कार्यान्वित

सिटी बेल | नवी मुंबई |

यावेळी सिटी बेल चे समूह संपादक मंदार दोंदे,समूह संपादक विवेक पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर राविशेठ पाटील यांनी वैभव यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि या अभिनव उपक्रमास उदंड यश लाभो अशी श्री साई चरणी प्रार्थना केली.

संगीत एक अगम्य अनुभूती आहे. त्याच्यातील नाद,लय,लहरी आणि कंपने यांचा मनुष्यावर परिणाम होत असतो, त्याच्या सकारात्मक वापराने असाध्य व्याधी ठीक होतात हे आता विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे.त्यामुळे म्युझिक थेरपी यास प्रचंड मागणी आहे.परंतु याचे फारसे ज्ञान नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो व ते या उपचार पद्धतीपासून दूर जातात.म्युझिक थेरपी ची माहिती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हे यु ट्यूब चॅनेल मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास वैभव सोनटक्के यांनी व्यक्त केला.

वैभव सोनटक्के स्वतः अप्रतिम बासरी वादक असून,सोशल माध्यमातून त्यांचे लाईव्ह कार्यक्रम श्रोत्यांना अवर्णनीय आनंद देत असतात.पंडित हरीप्रसाद चौरसिया यांच्या कडून प्रेरणा घेत बासरी वादनांतून रुग्णसेवा केल्या अत्यंत समाधान लाभते असे वैभव सोनटक्के म्हणाले.
अधुरम मधुरम चा आस्वाद घेण्यासाठी खाली दिलेली लिंक टच करा.

https://www.youtube.com/watch?v=rcuVVYlSF9w&feature=youtu.be

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.