वीज कोसळून एक शेतकरी ठार तर एक जखमी
सिटी बेल | हदगाव |
हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. गणेश ज्ञानोबा चव्हाण वय ६२ वर्ष राहणार उंचाडा असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते शेतात काम करत असताना दुपारी २ च्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली त्यातच त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत गणेश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उंचाडा गावात शोककळा पसरलीय.

दुपारच्या सुमारास मौजे उंचाडा गावात अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबरच विजांचा कडकडाट देखील सुरु होता. शेतामध्ये गणेश चव्हाण आणि त्यांचा मुलगा आनंद गणेश चव्हाण वय ३२ वर्ष शेतात काम करत होता, थोड्या अंतरावर असल्यामुळे त्याला विजेचा दाह लागल्यामुळे तो जखमी झाला, त्याला खाजगी उपचाराकरिता आ. बाळापूर येथे दाखल करण्यात आले. हदगाव येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी ५ च्या सुमारास शवविच्छेदनासाठी त्यांची मृतदेह नेण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले दोन सुना नातवंडे असा परिवार आहे. वेळी अवेळी पाऊसामुळे शेतीचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








Be First to Comment