Press "Enter" to skip to content

आमदार जळगावकर यांचा पूरग्रस्त भागात दौरा : शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर पोहोचले शेतावर

सिटी बेल | राहूल बहादूरे | हदगाव – नांदेड |

हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची मोठी हाणि झाल्याने शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

अतिवृष्टीमुळे मतदारसंघात हाहाकार झाला असल्याने शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत मदत मिळावी यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुंबई गाठत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन मतदार संघाचे अपडेट देऊन मदतीची मागणी केली.

यावेळी महिला काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर रेखाताई चव्हाण, तालुका अध्यक्ष आनंद भंडारे, माजी जिल्हापरिषद सदस्य पंजाबरप पाटील हरपकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर, येथील माजी सरपंच अनिल पवार, जिल्हा परिषद सदस्य के. सी सूर्यवंशी, श्रीनिवास मस्के, माजी नगरसेवक बाबू अण्णा पीच्केवर, संदीप काळबांडे, नगरसेवक फिरोज पठाण, आनंदराव मस्के, दशरथ मिजगर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे, यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूरग्रस्तांची पाहणी करत असताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की मतदार संघातील हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली जाऊन खरडून गेल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना सावरण्याची वेळ असून मतदार संघातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळवून देण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करणार असल्याचेही आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना सांगितले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.