Press "Enter" to skip to content

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा शहराची आढावा बैठक

सिटी बेल | खारघर |

शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तळोजा शहराची आढावा बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पार पडली. या बैठकीत तळोजा शहरातील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या शहरातील समस्यांवर जिल्हाप्रमुखांनी योग्य मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, शिवसेना गट प्रमुख व बूथ प्रमुख यांच्या नेमणुका करणेबाबत सूचना करण्यात आल्या.

या वेळी पनवेल उपजिल्हा संघटक परेश पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, उपमहानगर संघटक बाळा मुंबईकर, तळोजा शहर प्रमुख प्रदीप केणी तळोजा शहरातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.