सिटी बेल | पनवेल |
प्रभागातील एका भागात आराधना सोसायटी समोरील विजेची केबल ब्रेक झाल्याने परिसरातील एक फेज बंद झाला होता.त्यामुळे सोसायटीचे पाण्याचे पंप आणि लिफ्ट ला होणारा वीजपुरवठा बंद झाला होता.या विषयाची माहिती मिळताच नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महावितरण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती सर्व्हिस वायर टाकून घेण्यास सांगितली.

यामुळे सोसायटिंच्या पाण्याची समस्या दूर झाली.त्यानंतर लगेच काम पूर्ण करून घेण्यास सांगितले. ब्रेक झालेली वायर कापून जोडून घेण्यात आली.प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील तत्परतेने पाऊले उचलतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान केले आहे.








Be First to Comment