सिटी बेल | उलवे | घन:श्याम कडू |
गांधी जयंती औचित्य साधत रोटरी क्लब उलवे नोड तर्फे उलवे, बामणडोंगरी येथील रेल्वे स्टेशन येथे प्लास्टिक आणि इ वैस्ट जमा करण्यात आला.

जमा करण्यात आलेला प्लास्टिक व इ वैस्ट याचे व्यवस्थित वर्गीकरण करून त्याची योग्य त्या ठिकाणी पोहचविणे ही जबाबदारी रोटरी क्लब उलवे ह्यांनी घेतली आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी 10 ते 12 वाजेपर्यंत जमा करण्यात येईल.

या कार्यक्रमास साई संस्थानचे रविशेठ पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष शिरीष कडू, निलेश सोनवणे तसेंच सर्व रोटेरिअन उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.










Be First to Comment