Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यातील शिहू येथे वीज पडून एकाचा मृत्यू

सिटी बेल | रायगड | मंजुळा म्हात्रे |

सध्या कोकणासह अख्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गुलाब नंतर शाहीन चक्रीवादळामुळे बऱ्याच शेतकऱ्याचे पिक नेस्तनाबूत झाल्याचे पाहवयास मिळत आहे.

दिवसभर हवेत उष्णता आणि संध्याकाळी विजांच्या कडकडासह कोसळणारा पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, अशातच रविवार दिनांक ३ ऑक्टॉबर दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान शिहू विभाग परिसर ढगांच्या व विजांच्या गडगटाने दनावून गेला असतानाच दिलीप बाळाराम पाटील ( वय ४८ ) हे आपल्या शेतावरून घरी येत असताना वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिहू येथील रहिवासी दिलीप पाटील हे आपल्या शेतावरून घरी येत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली त्यामुळे त्यांना जोराचा शॉक बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घरातील अशा कर्त्या पुरुषाचं वीज पडून मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर जोराचा आघात झाला आहे व शिहू विभागात हळहळ व्येक्त होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.