शिवडी न्हावा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पग्रस्त मच्छीमार बांधवांना मिळणार पुनर्वसनाचा पहिला हप्ता
सिटी बेल | गव्हाण |
आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने गव्हाण ग्रुप ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. शिवडी न्हावा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अंतर्गत ज्या मच्छीमार बांधवांच्या जमिनी अधिग्रहित झालेल्या होत्या त्यांच्या पुनर्वसनाचा पहिला टप्पा प्राप्त होणार आहे. पुनर्वसनातील लाभार्थींच्या नावांची यादी वाचण्याचे महत्त्वाचे काम या विशेष ग्रामसभेत करण्यात आले. काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव अध्यक्ष महेंद्र घरत यांनी लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन केले.
ही यादी प्राथमिक स्वरूपाची असून यात काही दुबार नावे, मयत इसम यांची नावे अनवधानाने अंतर्भूत झालेली आहेत तसेच काही लाभार्थ्यांची नावे पात्र असून देखील अंतर्भूत झालेले नाहीत. त्यामुळे एम एम आर डी ए चे अधिकारी आणि संबंधित संस्थांशी समन्वय साधून यादी चे अंतिम स्वरूप हे दोषरहित असेल असे महेंद्र घरत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या ग्राम सभेला शेकाप नेते,प न प चे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव अध्यक्ष महेंद्र घरत,रा जि प सदस्य रवींद्र पाटील,सरपंच माई प्रकाश भोईर, उपसरपंच विजय हिरा घरत, सदस्य हेमंत कृष्णा पाटील, सचिन रघुनाथ घरत,रोशन हिरालाल म्हात्रे,पंकज पंढरीनाथ पाटील,माजी सरपंच पांडुरंग पुंडलिक घरत,माजी सरपंच रघुनाथ शेठ घरत,ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सुधीर तुळशीराम ठाकूर ,माजी सरपंच जिज्ञासा कोळी, सदस्या योगिता सुहास भगत, सुनिता गजानन घरत शिल्पा किरण कडू, कामिनी प्रमोद कोळी,उषा महेंद्र देशमुख, गिरिजाबाई जनार्दन कातकरी,न्हावा शेवा चे वपोनी मधुकर मटे,एम एम आर डी ए चे उप अभियंता भानुदास गायकवाड,विद्यालक्ष्मी केणी,कार्यकारी अभियंता एम पी सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment