Press "Enter" to skip to content

गव्हाण ग्रामपंचायतीकरीता देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सिटी बेल | गव्हाण |

गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णसेवेचा ताण पडत आहे.येथील विकसित होणारे सिडको नोड तसेच गव्हाण,कोपर, बेलपाडा, शेलघर येथील नागरिक यांची सेवा करताना हे केंद्र कमी पडत आहे.अन्य वैद्यकीय सुविधांचे सोबत येथे रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता होती.

रा जि प सदस्य यांनी रुग्णवाहिकेची जिल्हा परिषदेकडे मागणी केली होती.
आज २ सप्टेंबर रोजी या रुग्णवाहिकेचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

यावेळी शेकाप नेते प न प चे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव अध्यक्ष महेंद्र घरत,रा जि प सदस्य रवींद्र पाटील,सरपंच माई प्रकाश भोईर, उपसरपंच विजय हिरा घरत, सदस्य हेमंत कृष्णा पाटील, सचिन रघुनाथ घरत,रोशन हिरालाल म्हात्रे,पंकज पंढरीनाथ पाटील,माजी सरपंच पांडुरंग पुंडलिक घरत,माजी सरपंच रघुनाथ शेठ घरत,ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सुधीर तुळशीराम ठाकूर ,माजी सरपंच जिज्ञासा कोळी, सदस्या योगिता सुहास भगत, सुनिता गजानन घरत शिल्पा किरण कडू, कामिनी प्रमोद कोळी,उषा महेंद्र देशमुख, गिरिजाबाई जनार्दन कातकरी,न्हावा शेवा चे वपोनी मधुकर मटे,एम एम आर डी ए चे उप अभियंता भानुदास गायकवाड,विद्यालक्ष्मी केणी,कार्यकारी अभियंता एम पी सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.