Press "Enter" to skip to content

“न्याय सर्वांसाठी” या अभिनव उपक्रमाच्या प्रचारासाठी बाईक रॅली चे आयोजन

वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी पनवेल न्यायालयामार्फत मोफत वकिली सेवा मिळणार

न्यायाधीश,वकील,पोलीस,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार यांनी घेतला सहभाग

सिटी बेल | पनवेल |

आज दिनांक २ ऑक्टोबर २०२१ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघ पनवेल यांच्या वतीने “न्याय सर्वांसाठी” या अभिनव उपक्रमाच्या प्रचारासाठी बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने उपक्रमास सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर मा.न्यायाधीश, वकील, सर्व सेवाभावी संस्था व विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सत्र न्यायालय पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पुन्हा पनवेल सत्र न्यायालय अशा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक २ ऑक्टोबर २०२१ महात्मा गांधी जयंती ते १४ नोव्हेंबर २०२१ पंडित जवाहरलाल नेहरू जयंती पर्यंत “न्याय सर्वांसाठी” या संदेशाद्वारे समाजातील विविध वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी पनवेल न्यायालयामार्फत मोफत सेवा देण्यात येणार आहे. यासाठी दुर्गम ठिकाणे,ग्रामीण विभाग अशा ठिकाणी शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा न्यायाधीश मा. अस्मर साहेब, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मा. राव साहेब, दिवाणी न्यायाधीश मा.भाकरे साहेब व मा.मुजावर साहेब, तसेच श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ,पनवेल तालुका पोलीस स्टेशन चे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र दौंडकर, पनवेल वाहतूक शाखेचे अधिकारी/कर्मचारी व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मा. न्यायाधीशांनी खास पत्रकारांसोबत आग्रहाने फोटो काढून घेतला तो क्षण

या उपक्रमात अमिटी लॉ कॉलेज,के एल इ कॉलेज,कळंबोली,बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज,तळोजा,सेंट विल्फ़्रेंड लॉ कॉलेज या विधी महाविद्यालयांनी सहभाग घेतला तर आयोजनात इन्फिनिटी फाउंडेशन,ओक्रे इंडिया,ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थान या सेवाभावी संस्थांनी तसेच पंचायत समिती कार्यालय, तहसीलदार कार्यालय यांनी सहभाग नोंदविला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.